Disha Shakti

सामाजिक

श्री सतिश बळवंतराव यांना कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक पुरस्कार

Spread the love

धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांच्या वतीने देण्यात येणारा कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक पुरस्कार तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील सहशिक्षक मा. श्री बळवंतराव सतीश शिवाजी यांना मा. श्री सुधाकर तेलंग विभागीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर. विभागीय मंडळ लातूर.व मा. श्री डॉ. गणपतराव मोरे शिक्षण उपसंचालक लातूर, विभाग लातूर. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी चे अध्यक्ष मा. डॉ. बी वाय यादव उपाध्यक्ष मा. नंदनजी जगदाळे, सचिव मा. श्री पी टी पाटील खजिनदार मा. जे सी शितोळे सहसचिव मा.श्री ए पी देबडवार यांच्या हस्ते देण्यात आला .

हा पुरस्कार देताना आपण संस्थेत अध्यापनाचे कर्तव्य निष्ठेने करत आहात. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन कर्मवीरांच्या विचारांचा वारसा चालवत आहात. तसेच गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी व संस्कारक्षम पिढी घडविण्यात आपले उल्लेखनीय योगदान आहे. आपले विद्यार्थी व समाजाप्रती असलेले कर्तव्य तत्पता व सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून आपल्याला शैक्षणिक वर्ष 2024 25 करता माध्यमिक विभागातून आपणास कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!