Disha Shakti

क्राईम

घातक शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारास राहुरी पोलिसांनी केले जेरबंद

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : आज दिनांक 2110/2024, रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे असताना पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की राहुरी कॉलेज परिसरात एक इसम घातक शस्त्र जवळ बाळगून दहशत करविताना फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने सदर नमूद बातमीची हकीगत गुन्हे शोध पथकास देऊन तात्काळ नमूद ठिकाणी रवाना केले असता सदर ठिकाणी टाकलेल्या छाप्यामध्ये नमूद इसम नामे आदित्य प्रकाश नारद वय 20 वर्ष रा.राहुरी बुद्रुक राहुरी अहिल्यानगर हा बेकायदेशीर रित्या लोखंडी पाते असलेले लाकडी मुठ असलेली कत्ती कब्जात बाळगताना मिळून आला आहे. त्यास राहुरी पोस्टे येथे आणून पोलीस कॉन्स्टेबल 24 53 गोवर्धन अंबादास कदम यांनी त्याचेविरुध्ध फिर्याद नोंदवली असून त्यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोस्टे येथे आर्म ऍक्ट कलम 4,25 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज गायकवाड हे करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री.राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे सो.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि.अहिल्यानगर, श्री.डॉ.बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि.अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल सुरज गायकवाड,राहुल यादव , प्रमोद ढाकणे , सतीश कुराडे, नदीम शेख, अंकुश भोसले,गोवर्धन कदम नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि.अहिल्यानगर यांनी केलेली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!