राहाता प्रतिनिधी / विठ्ठल ठोंबरे : समाज सेवा ही ईश्वर सेवा आहे. तसेच अन्नदान सोबत इतर साहित्य दान करणारा व त्यासाठी इच्छाशक्ती, मनमोकळ्या पणाने दान करायला लावणारां ही भगवंत आहे. समाजसेवा ही आपल्या सोबत आपल्या मुलांच्या मनात देखील तशीच भावना निर्माण करत असते व त्यांना सामाजिक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. चोळकेवाडी येथील स्वरा महिला बचत गटाच्या वतीने बेलापूर येथील श्री साई विठ्ठल अनाथ आश्रम गोखलेवाडी,बेलापूर रोड,श्रीरामपूर येथील ह.भ.प कृष्णानंद महाराज यांच्या वसतिगृहा मध्ये १५ लिटरचा एक गोड- तेलाचा डब्बा, खाऊ, बिस्किटे तसेच ५० किलो साखर देऊन वस्तीगृहातील सर्व विद्यार्थ्यांच्या दिवाळी सणाच्या उत्सहात सामील होऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊन मनमोकळ्या पणाने आनंद लुटला.त्यांची खूप काही इच्छा नसते पण आपल्या नशिबातील थोडस या अनाथ मुलांना ही देऊन बघा नक्कीच आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.सदरच्या कार्यक्रमासाठी गटातील सौ.लक्ष्मीबाई शिवराम जेजुरकर,आशाबाई मारूती चोळके, वनिता राजेंद्र चोळके,जयश्री नितीन चोळके,दीक्षा शरद जेजुरकर, राजेंद्र चोळके व दत्तू चोळके (रिक्षावाले) आदी मान्यवर उपस्थित होते.
Leave a reply