Disha Shakti

इतर

नेटावटे यांची तात्काळ बदली करा अन्यथा आंदोलन – कुरूमकर

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / जावेद शेख  : विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील भ्रष्ट व मग्रूर लिपिक प्रशांत नेटावटे यांची शिक्षक भारती संघटनेकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहे.वरिष्ठ शिक्षक,प्राचार्य यांच्याशी असभ्य वर्तन,महिलांशी वाद घालणे,जाणून बुजुन फाईल अडवणे,फाईल गहाळ करणे,फाईल निवेदन इनवर्ड न करणे,शालार्थ आय.डी. प्रकरणे प्रलंबीत ठेवणे,आर्थिक देवाण घेवाण करणे,शिक्षक-शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांच्या संस्थेस सांगून त्यांना त्रास देने,कर्मचाऱ्यांना शारीरिक मानसिक त्रास देणे, संघटना पदाधिकारी यांना उडवा उडवी चे उत्तरे देणे अशा विविध तक्रारीमुळे संबंधित लिपिक नेटवटे यांचे तात्काळ बदली करण्यासंदर्भात निवेदन शिक्षण आयुक्त पुणे,शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्चमाध्यमिक) पुणे, विभागीय उपसंचालक पुणे यांना दिले आहे सदर कर्मचाऱ्यांची बदली झाली नाही तर शिक्षक भारती आंदोलनाच्या पवित्रात आहे असे प्रतिपादन शिक्षक भारती विनाअनुदान संघर्ष समिती राज्याध्यक्ष जयवंत भाबड, महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर यांनी सांगितले संबंधित लिपिक नेटावटे यांची चौकशी करून दप्तर दिरंगाई कायद्याअंतर्गत कारवाई करून तात्काळ बदली करावी अशी शिक्षक भारती संघटनेने मागणी केली आहे या मागणीला राज्याध्यक्ष अशोक बेलसरे,कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राजेंद्र लोंढे, सुनील गाडगे, विनोद रोकडे, के.के. अहिरे जयवंत भाबड, आप्पासाहेब जगताप, रामराव काळे, महेश पाडेकर आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!