राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरीमध्ये कॉलेज रोड परिसरात मुलींची छेडछाड करणाऱ्या दोन टवाळखोर तरुणांची यथेच्छ धुलाई करूत दिले पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना राहुरी शहरातील कॉलेज रोड परिसरात दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारच्या दरम्यान घडली. राहुरी शहरातील तीन काॅलेज तरुणी दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी काॅलेजला गेल्या होत्या दुपारी अडिच वाजे दरम्यान त्या काॅलेजच्या मधल्या रोडने राहुरीकडे येत होत्या. तेव्हा तेजदिप हाॅटेल समोर मोटारसायकलवर दोन तरुणांनी त्या काॅलेज तरुणांचा पाठलाग करून अश्लील हातवारे केले. त्यावेळी काॅलेज तरुणींनी त्या दोन तरुणांना शिवीगाळ करुन अश्लील हातवारे केल्याचा जाब विचारला. तेव्हा त्या तरुणांनी सदर काॅलेज तरुणींच्या अंगावर धावून जात त्यांचा हाथ धरुन दमदाटी केली. त्यावेळी काॅलेज तरुणींना आरडाओरडा केला. तेव्हा रस्त्याने जात असलेल्या सुमारे १५ ते २० काॅलेज तरुणांनी त्या दोन टवाळखोर तरुणांची यथेच्छ धुलाई केली. आणि त्यांना राहुरी पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी काॅलेज तरुणींच्या पालकांनी व नातेवाईकांनी पोलिस ठाण्याच्या आवारात प्रचंड गर्दी केली होती. या घटने बाबत दुपारी उशिरापर्यंत पोलिस कारवाईचे काम सुरु होते. सदर दोन टवाळखोर तरुण हे राहुरी तालुक्यातील असून एक आर्मीमध्ये नोकरी करत आहे. तर दुसर्या तरुणाचा पुढील आठवड्यात आर्मी भरतीचा पेपर असल्याची माहिती समोर येत आहे. राहुरी काॅलेज व शहरात असलेल्या शाळा परिसरात शाळा सुटल्यावर व शाळा भरते वेळी अनेक टवाळखोर तरुण मोटारसायकल चकरा मारत असतात. तसेच मुलींचे छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. सदर टवाळखोर तरुणांचा पोलिस प्रशासनाने बंदोबस्त करावा. अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.
कॉलेज रोड परिसरात मुलींची छेडछाड काढणाऱ्या दोन टवाळखोर तरुणांची कॉलेज तरुणांकडून यथेच्छ धुलाई करत केले पोलिसांच्या स्वाधीन

0Share
Leave a reply