राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी खुर्द येथे नगर-मनमाड महामार्गावर चुकीच्या बाजूने माल वाहतूक पिकअप वाहन चालविणाऱ्या चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक तरूण राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथील महाविद्यालयीन युवक चैतन्य विनायक लांबे (वय-१७) तर दुसरा तरूण टेंभुर्णी येथील शिवाजी बापू जाधव असल्याची माहिती समजली आह़े.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नगरकडून – राहुरीकडे भरधाव वेगाने मालवाहतूक करणारी पिकअप येत असताना राहुरी खुर्द येथील महामार्गालगत असलेल्या देवस्थानाजवळ या चालकाने तो राहुरीकडे येत असलेल्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाल्याने त्याने दुभाजक ओलांडून त्याची पिकअप वळवून चुकीच्या बाजूने भरघाव वेगाने चालू लागला. त्यानंतर त्याचा वाहनावरील ताबा सुटला. याचवेळी हे वाहन भरधाव वेगात असल्याने समोरून येणार्या दोन दुचाक्या व काही वाटसरूंना उडविले. या भीषण अपघातात दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार झाले. तर तीन वाटसरू गंभीर जखमी झाले आहेत.
यातील काही जखमींना राहुरीच्या ग्रामीण रूग्णालयात तर काहींना नगर येथे उपचारासाठी नेले असल्याची माहिती मिळाली असून या अपघातानंतर राहुरी खुर्द येथील ग्रामस्थांनी जखमी तात्काळ मदत करत उपचारासाठी पाठविण्यासाठी मदत केली नगर-मनमाड महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती समजताच राहुरी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड, भाऊसाहेब शिरसाठ यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. पिंपरी अवघड येथील तरुण चैतन्य लांबे याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले असताना आज त्याचे निधन झाल्याने कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या या अपघाताती जाण्याने पिंपरी अवघड या गावावर शोककळा पसरली आह़े.
राहुरी खुर्द येथे पिकअपवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात; अपघातात दोघे ठार तर तीघे जखमी

0Share
Leave a reply