Disha Shakti

सामाजिक

श्रीरामपूर येथे दोस्ती फाऊंडेशनचा पुरस्कार सोहळा व कवी संमेलन मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न.

Spread the love

 मुंबई कांदिवली पश्चिम / भारत कवितके :  रविवार दिनांक 27 आक्टोंबर 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत दोस्ती फाऊंडेशन चे पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलन मोठ्या उत्साहात जल्लोषात संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते पुस्तक पूजन केले. हॉटेल साई चंद्रानी येथे दोस्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख यांनी आपले वडील पैगंबर वाशी मजनू भाई शेख यांचे स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्र राज्यातील सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक, कलावंत, धार्मिक, दिग्दर्शन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ता भारत कवितके मुंबई कांदिवली पश्चिम यांना यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते पत्रकार रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी रज्जाक शेख यांनी आपल्या प्रास्ताविकात दोस्ती फाऊंडेशनच्या कार्याचा आढावा घेऊन आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.या कार्यक्रम ला लाभलेले प्रमुख अतिथी सुभाष सोनवणे यांनी सांगितले की,” माणुसकीला जाग आणणारे तुम्ही साहित्यिक असतात.महिना दोन लाख पगार घेणाऱ्यांना समाजाशी काही घेणे देणे नसते,ते घरी फक्त झोपा काढत असतात. कधी कधी वाटतं आपण लोकशाहीत आहोत का हुकुमशाहीत ,15 आगस्ट,26 जानेवारी ला छोटी छोटी मुले तिरंगा झेंडा विकताना दिसतात,पाईप मध्ये झोपतात,हे आपलं स्वातंत्र्य का? लेखणीची तलवार तुम्ही चालविणे आता काळाची गरज आहे.” कार्यक्रम चे उद्घाटक धोंडीराम राजपूत यांनी सांगितले की,” कलावंतांना कोणतीही जात नसते, माणूस नावापेक्षा कर्माने जास्त ओळखला जातो.

समाजातील तुमची उंची आणखी वाढवा.”या वेळी पुरस्कार वितरण सोहळा नंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला.व कवी संमेलन सुरू केले.लावणी,गजल, भावगीत,विऩोदी, विविध रसानी भरलेल्या कविता कवी व कवयित्रीनी सादर केल्या.कार्यक्रमातील यथार्थ वर्णन शिघ्र कवयित्री रंजना बोरा यांनी कवितेतून मांडले.सुनिता कपाळे, सुनिता वाळूंज,सिमाराणी, प्रमोद सूर्यवंशी शैलेश सुतार, माणिक गोडसे व इतर कवी कवयित्रीच्या कविता वाचून तर कोणी गाऊन सादर केल्या.दोस्ती फाऊंडेशनचे रज्जाक शेख यांनी मात्र” बाप माझा सोडून गेला ” ही कविता गाऊन सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले, शब्दात खूप मोठी ताकद असते हे जाणवले.

या प्रसंगी सुभाष सोनवणे, धोंडीराम राजपूत, रविकांत शार्दुल, रंजना बोरा, सुनिता वाळूंज, सुनिता कपाळे आदी मान्यवर उपस्थित होते.एकंदरीत श्रीरामपूर येथे दोस्ती फाऊंडेशनचा पुरस्कार वितरण सोहळा व कवी संमेलन मोठ्या उत्साहात जल्लोषात पार पडले.पुरस्कार वितरण सोहळा चे सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी व कवी संमेलन चे सूत्रसंचालन रंजना बोरा यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!