नांदेड जिल्हा प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नायगाव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उच्च विद्याविभूषित डॉ मिनलताई खतगावकर यांनी हजारो समर्थक व महविकास आघाडी कार्यकर्त्याच्या उपस्थितीत जाहीर सभा घेऊन शेवटच्या दिवशी काँग्रेस पक्षाकडून आपला अर्ज दाखल केला.या वेळी नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षकमाजी खा.भास्करराव
पा.खतगावकर,जहिराबाद चे खा. सुरेश शेटकर,लोकसभेचे उमेदवार प्रा.रवींद्र वसंत चव्हाण,माजी आ.ओम प्रकाश पोकर्णा केशव पा.चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दीं 29 रोजी माजी खा.मंत्री खतगावकर दादा यांच्या स्नुषा मिनलताई खतगावकर यांनी आपली उमेदवारी दाखल केल्या नंतर जाहीर सभा घेण्यात आली.
सभेच्या प्रारंभी दिवंगत खासदार कै.वसंतराव पाटील चव्हाण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित हजारो कार्यकर्त्यांच्या अफाट जनसागर त्यांच्यातील उत्साह पाहून मला पक्के पटले आहे की नायगाव विधानसभा मतदार संघातील जनता परिवर्तनासाठी सिध्द झालेली आहे.माझ्या नायगाव मतदार
संघातील जनतेला एवढेच सांगणे आहे की मतदार संघाचा सर्वांगिण विकास डोळ्यापुढे ठेवून मी राजकारणात पाऊल टाकले आहे. येथील तरुणांचे, शेतकऱ्यांचे, कामगारांचे आणि महिलांचे प्रश्न समजून घेतत्यावर काय उपाय करता येतील यावर देखील मी विचार केला आहे..स्व.खा.वसंत चव्हाणच्या बलिदानाने अधुरे स्वप्न पूर्ण करण्या साथी साठी काँग्रेस विजयी करा प्रा.रवींद्र चव्हाण
सभेचे अध्यक्ष स्थानावरून माजी मंत्री तथा मा.खासदार भास्करराव पाटील खतगावकर साहेब यांनी सभेला संबोधित केले.विरोधक आपल्याला जाती पातीत अडकविण्याचा प्रयत्न करतील मात्र आपण त्यांना अजिबात थारा द्यायचा नाही,असे त्यांनी जनतेला सांगितले त्याचबरोबर महायुती सरकारचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर मांडला. यावेळी संजय आपा बेळगे,प्रल्हाद पाटील इजातगावकर , सुरेखताई गोळे गावकर,संभाजी पाटील भिलवंडे, सेना तालुका प्रमुख रवींद्र पाटील भिलवंडे,उप जिल्हा प्रमुख गिरी, डॉ सुनील कदम आदींची भाषण झाली. नांदेड जिल्ह्याचे प्रभारी तथा जहीराबादचे खासदार सुरेशजी शेटकर यांनीही उपस्थिती लावली.यावेळी मंचावर माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, केशवराव पा.चव्हाण, हणमंतराव पाटील चव्हाण,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील चव्हाण, जे.पी.पाटील, गणेशराव पाटील करखेलीकर, नागोराव पाटील रोशनगावकर, श्रीनिवास पाटील चव्हाण, सरजीतसिंग गिल,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, राष्ट्रवादीचे भास्कर पाटील भिलवंडे,गोविंदराव पाटील सिंधीकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी,माजी सभापती संजय आप्पा बेळगे,काँग्रेस कमिटी उमरीचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील ढगे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र पाटील भिलवंडे,सभापती रवी पाटील खतगावकर, राष्ट्रवादीचे धर्माबाद तालुकाध्यक्ष दिलीप पाटील चिकनेकर, धर्माबाद चे उपनगराध्यक्ष रमेश तिवारी,रेखाताई गोळेगावकर, राष्ट्रवादीचे विश्वंभर बडूरे,शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गणेश गिरी, शिवसेनेचे धर्माबाद तालुकाध्यक्ष रामचंद्र रेड्डी,गणेश सादलापूरकर, जितेंद्र पाटील, उमरी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष बालाजी पाटील सावंत,काँग्रेस सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर कत्ते,सय्यद इसाक,डॉ.राठोड,जयराम पाटील बाभळीकर,भास्करराव धर्माधिकारी, गोविंद हनवटे,माजी सभापती मारुती कागेरू,विनायक पाटील हुसेकर, महिला काँग्रेस उमरीच्या तालुकाध्यक्ष कांताताई पुदलवाड,जावेद सर, सय्यद सुलताना, राजश्री पाटील, बालाजी पाटील हातनीकर,शिवाजी पाटील जाधव कुष्णूरकर,जगदीश कदम, नागोराव पाटील वारले,माधवराव धर्माधिकारी, सतीश हनमंते,श्रीराम पवार, प्रताप पाटील जिगळेकर, एन डी पवार यांच्यासह नायगाव, उमरी, धर्माबाद तालुक्यातील हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. जाहीर सभेचे सुरेख सूत्रसंचलन आभार प्रा. जीवन पा. चव्हाण यांनी केले
Leave a reply