राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदार संघासाठी काल दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत एकूण २७ उमेदवारांनी ३८ नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यापैकी आज झालेल्या छाननीत ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनी दिली. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडून राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानंतर दि. २२ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२४ रोजी दरम्यान अर्ज भरण्यासाठी मुदत होती. या दरम्यान काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजे पर्यंत एकूण ८१ व्यक्तींनी ११५ अर्ज नेले. त्यापैकी २७ उमेदवारांनी ३८ अर्ज दाखल केले होते. मात्र आज दि. ३० ऑक्टोबर रोजी झालेल्या छाननीत प्रमिला किशोर देसर्डा, अपक्ष, मोहम्मद शोएब सुभेदार शेख, अपक्ष तसेच रुपाली संदेश भाकरे, बहुजन समाज पार्टी या तिघांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दहावा सूचक नसल्याने अवैध ठरवीले. तर ३५ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानूसार शरदचंद्र पवार गटाकडून प्राजक्त प्रसादराव तनपुरे, भारतीय जनता पक्षाकडून शिवाजी भानुदास कर्डिले, शरदचंद्र पवार गटाकडून बदली उमेदवार अरुण बाबुराव तनपुरे, साहेबराव पाटीलबा म्हसे यांनी एक महाराष्ट्र स्वराज्य पार्टी व एक अपक्ष, मनसेकडून ज्ञानेश्वर दत्तात्रेय गाडे, वंचितकडून अनिल भिकाजी जाधव, एल्गार पार्टीकडून जयेश साहेबराव माळी, रासपकडून नानासाहेब पंढरीनाथ जुंधारे व शिवाजी गोविंद खेडेकर, लोकशाही पार्टीकडून सोहम बापूसाहेब चिंधे, आझाद समाज पार्टी काशिराम यांच्याकडून सिकंदर बबन इनामदार, रिपाइं आंबेडकर गटाकडून प्रदीप प्रभाकर मकासरे, तसेच इम्रान नबी देशमुख यांनी एक बहुजन मुक्ती पार्टी व एक अपक्ष, तसेच अपक्ष म्हणून सूर्यभान दत्तात्रय लांबे, दीपक विठ्ठल बर्डे, अल्ताफ इब्राहिम शेख, डॉ. जालिंदर घिगे, अक्षय रावसाहेब तनपुरे, अरुण भागचंद तनपुरे, मोहम्मद शोएब सुभेदार शेख, संतोष एकनाथ चोळके, विजय दत्तू साळवे, सविता ज्ञानेश्वर मेहेत्रे, ज्ञानेश्वर बापूसाहेब मेहत्रे, संदीप सोपान चोरमले यांनी अर्ज वैध ठरवीले.
यामुळे राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघात बहुरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी मत विभागणीच्या भितीमुळे प्रस्तापीतांची धाकधूक व डोकेदुखी वाढली आहे. असे असले तरी खरी लढत ही आमदार प्राजक्त तनपूरे व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यात चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहे. दरम्यान या मत विभागणीचा फायदा कोणाला होणार व तोटा कोणाला होणार, याबाबत तालुक्यात अनेक जण आप आपल्या पद्धतीने तर्क वितर्क व गणिते मांडत आहेत.
Leave a reply