विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : पारनेर शहरासह तालुक्यातील राजकीय प्रस्थापितांची दहशत मोडीत काढण्यासाठी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असून राणीताई लंके यांना मोठे मताधिक्य दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना करत टाकळीढोकेश्वर गावचे ग्रामदैवत मारुतीचे दर्शन घेऊन निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी दंड थोपटले.
जिल्ह्यातील सुरुवातीपासूनच सर्वाधिक लक्षवेधक ठरलेल्या पारनेर विधानसभा मतदारसंघात अगदी सुरुवातीपासूनच सामाजिक राजकीय कार्यात अग्रेसर असलेल्या राणीताई लंके यांच्यासारख्या सर्वसामान्य जनतेच्या मनातील तुतारीचे उमेदवार मिळाल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये पर्यायाने संपूर्ण मतदारसंघात कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे दिसत आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघातील टाकळी ढोकेश्वर येथिल ग्रामदैवत मारुती मंदिरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्यातील मुख्य पदाधिकारी नारायण झावरे साहेब व कार्यकर्ते यांनी आज शनिवार दि. २ नोव्हेंबर रोजी सकाळी शेकडो कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करत प्रचाराचा नारळ वाढवून प्रचारास सुरुवात केली आहे. प्रचार फेरी वाजता गाजत कार्यकर्त्यांसह गावच्या वेशीसमोर आले तेव्हा निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी यांनी दंड थोपटून प्रस्थापितांना इशारा दिला असून पारनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व निलेश लंके प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
टाकळी ढोकेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळीढोकेश्वर परिसरातून राणीताई लंके यांना मोठे मताधिक्य देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडीतील मुख्य दोन घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे , ओबीसी सेलचे प्रमुख पदाधिकारी या सर्व घटकपक्षातील कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह संचारला आहे. दोन पक्षातील पदाधिकारी देखील राणीताई लंके यांच्या परचारात सहभागी होताना दिसत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये टाकळी ढोकेश्वर गटातून कोणत्याही परिस्थितीत राणीताई लंकेंनाच मताधिक्य मिळणार असल्याचा दावा तरुणांनी व्यक्त केला.
चौकट:: पारनेर मतदारसंघांमध्ये अनेक गावांमध्ये तरुण वर्गाचे पाठबळ लाभत असल्याचे समाधान आहे. टाकळी ढोकेश्वर गटातील समस्या सोडविण्यासाठी खासदार निलेश लंके यांच्या माध्यमातून सर्वस्व पणाला लावणार आहे. शेकडो जणांनी खासदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्याचे समाधान आहे. सर्वसामान्यांच्या अपेक्षापूर्ती करीत राज्यात पारनेर मतदारसंघाचा कायापालट व नावलौकिक उंचावल्या शिवाय राहणार नाही असा विश्वास बाळासाहेब खिलारी यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी चेअरमन नारायण झावरे साहेब, निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी,आदर्श गाव योजनेचे अध्यक्ष महेश पाटील, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष मळिभाऊ रांधवण, सोमनाथ बांडे,सिराज हवलदार, अशपाक हवलदार, अक्षय खिलारी, सौरभ कटारिया, विलास धुमाळ, विलास नाईकवाडी, वसंतराव झावरे, बबनराव बांडे, लक्ष्मण झावरे, नामदेव बांडे, साहेबराव बांडे, सुभाष महाराज जाधव, बबन झावरे, सुरेश झावरे, प्रतीक चव्हाण, सुशांत आल्हाट,सुरज पाटील, मंथन गायकवाड, निलेश गायकवाड, बबन सोनबा बांडे, गंगाधर बांडे, रामदास रांधवण, नामदेव ठुबे, सुरेश बांडे, खंडू गोरडे नाना झावरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
मारुतीचे दर्शन घेऊन बाळासाहेब खिलारी यांनी थोपटले दंड, नारायण झावरे यांनी केला प्रचारास प्रारंभ

0Share
Leave a reply