दिशाशक्ती सोनई /ज्ञानेश्वर सुरशे : दि.02/11/2024 रोजी 09.30 ते 12.30 वा. दरम्यान आगामी विधानसभा निवडणूक- 2024 नेवासा 221 मतदार संघात व सोनई पोलीस ठाणे हद्दीत निर्भय व पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पडण्याच्या उद्देशाने सोनई पो स्टे हद्दीतील मौजे सोनई, घोडेगाव, चांदा, या गावातील मुख्य रस्ते, बाजारपेठा, संवेदनशील व गर्दीच्या ठिकाणी सोनई पोलीस स्टेशनचे सपोनि विजय माळी, 02 पोलीस अधिकारी , 10 पोलीस अंमलदार तसेच सी.आर.पी.एफ . चे 3 पोलीस अधिकारी व 35 जवानांनी रूट मार्च काढून पोलीस यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचा संदेश नागरिकांना देण्यात आला.
सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने व निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवात आपले योगदान पार पाडण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात आलेले आहे.
सोनई पोलीस ठाणे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज, निर्भयपणे आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे नागरिकांना आवाहन

0Share
Leave a reply