Disha Shakti

राजकीय

राहुरी मतदार संघातील आजी-माजी आमदारांचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष – सुरेशराव लांबे

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : चालू वर्षी राज्यात सरासरीपेक्षा समाधानकारक पाऊस झाला सर्व धरणे ओव्हर फ्लो झाली, पिके ही चांगली आली परंतु संपूर्ण राज्यासह राहुरी तालुक्यात परतीच्या पावसामुळे व त्या पाठोपाठ सततच्या पावसाने शेतकऱ्यांची कापूस सोयाबीन कांदा जनावरांची चारा पिके व फळबाग याचे मोठे नुकसान झाले,सध्या विधानसभेची आचार संहिता चालू असल्यामुळे आजी व माजी आमदार सध्या निवडणूकीत दंग आहेत, व त्याआधीही आरोप प्रत्यारोप व श्रेयवाद यामध्येच दंग होते त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे नेहमीच दुर्लक्ष केले,तरीही त्यांना पुन्हा आमदार होण्याचे डो-हाळे लागले आहेत,त्यांना या आधी शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नव्हता व आता आचारसंहितेमुळे अधिकार नाहीत,तरी जिल्हा अधिकारी प्रशासनाने पिकांचे पंचनामे करून पीडित शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी मागे जाहीर केल्याप्रमाणे एनडीआर एफच्या निकषाच्या दुप्पट अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे अशी मागणी अपक्ष उमेदवार शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी राहुरी तहसीलदार प्रशासनाल केली,

पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले शेतकरी वर्ग अनेक दिवसापासून कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जात आहे,त्यातच आताच‌ झालेली राज्य शासनाची मदत ही नगंण्य पिकविमा असलेल्या शेतकऱ्यांनाच झाली,याआधी अनेकदा शेतकऱ्यांनी पिकविण्याची रक्कम भरली परंतु भरपाई मिळाली नाही,त्यामुळे अनेक शेतकरयांनी पिक विमा भरण्यास पाठ फिरवली,त्यातच चालु वर्षी संपुर्ण महाराष्ट्रासह राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस त्या पाठोपाठ सतत पाऊस अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सातही महसूल मंडळातील कापूस कांदा सोयाबीन जनावराचे चारा पिके व फळबागांचे मोठें नुकसान झाले, एनडीआरएफ च्या निकाषाच्या दुप्पट म्हणजेच जिरायती पिकांसाठी हेक्टरी १३६०० रूपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी २७००० रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी ३६००० रुपये या प्रमाणे अनुदान मंजुर करुन ते त्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावे, तरी जिल्हाधिकारी प्रशासनाने या मागणीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा,अशी मागणी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केली,


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!