श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय नाट्य व उमेदवारिच्या हट्टात अखेर महायुतीत फूट पडली आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) कडून लहू कानडे, शिवसेना (शिंदे गट ) कडून भाऊसाहेब कांबळे या दोनही उमेदवारांनी आपले अर्ज माघारी न घेतल्याने महायुतीत फूट पडून श्रीरामपूर मतदार संघात महायुतीची मैत्रीपूर्ण लढत होणार का,सरळ लढत..??..असे असताना काँग्रेसचे हेमंत ओगले व मनसेचे राजाभाऊ कापसे हे उमेदवारी करणार आहे त्यामुळे श्रीरामपूर मतदारसंघात आता चौरंगी लढत होणार आहे.
माजी खासदार सदाशिव लोखंडे, त्यांचे पुत्र प्रशांत लोखंडे, संतोष भाऊसाहेब कांबळे यांच्यासह सहा उमेदवारानीं आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. श्रीरामपूर मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच मनसेला उमेदवारी मिळाली आहे. महायुतीकडून आरपीआयला श्रीरामपूर मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने आरपीआयचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांनी मनसेत प्रवेश करून मनसेकडून उमेदवारी घेतली आहे.या सोबतच श्रीमंत संभाजीराजे यांच्या स्वराज पक्षाकडून जितेंद्र तोरणे, वंचित बहुजन आघाडीकडून आण्णासाहेब मोहन, कट्टर हिंदुत्ववादी असलेले सागर बेग व इतर अपक्ष असे एकुण 16 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
Leave a reply