Disha Shakti

Uncategorized

अजित पवारांवर विश्वास ठेवत सुजित पाटलांची सर्व क्षमता असताना माघार, पवारांच्या शब्दाला सुजित पाटील झावरे जागले

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पारनेर नगर विधानसभा मतदार संघात अनेक अपक्षांनी अर्ज माघारी घेतले. निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पवार कुटुंबाचे खंदे समर्थक सुजित झावरे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अजित पवार यांच्या सोबत असलेले घनिष्ठ सबंध व अजित पवार यांनी सुजित पाटलांसोबत दूरध्वनी वरून संपर्क साधल्यामुळे अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवून सुजित झावरे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली.

या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून राणीताई लंके तर महायुतीकडून ज्येष्ठ नेते काशिनाथ दाते सर उमेदवारी करत आहेत. माजी आमदार विजय औटी, माजी नगराध्यक्ष विजू औटी तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसेना नेते संदेश कार्ले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पारनेर तालुक्याच्या राजकारणात स्व. माजी आमदार वसंतराव झावरे पाटील व सुजित झावरे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्थापनेपासून सोबत होते. परंतु तालुक्याच्या राजकारणात मध्यंतरी स्थित्यंतरे झाल्याने सुजित झावरे यांनी अलिप्त पणाची भूमिका घेतली होती. पवार कुटुंबाच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षामध्ये तालुक्यात काम करत असताना अनेक विकासाची कामे मार्गी लावली.

सद्य परिस्थितीत तालुक्याच्या राजकारणात सुजित झावरे पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. हे अजित पवार यांना माहित असल्या मुळे सुजित झावरे यांना संपर्क करून अजित पवार यांनी त्यांच्यासोबत तालुक्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली व सुजित झावरे पाटील यांनी अपक्ष उमेदवारी भरली असल्याने ती माघार घेण्यासाठी त्यांना सांगितले अजित पवार यांचा शब्द सुजित पाटलांनी प्रमाण मानून व त्यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास पूर्ण करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली सुजित पाटील यांनी उमेदवारी केली असती तर तालुक्याच्या राजकारणात सध्या चित्र वेगळे असते परंतु पवार कुटुंब व अजित पवार यांच्या विश्वासाला सुजित झावरे पाटील हे जागले आहेत. अजित पवार सुजित झावरे पाटील यांना पुढील राजकारणात योग्य तो न्याय देतील ही अपेक्षा.

या विधानसभा निवडणुकीमध्ये पारनेर तालुक्याच्या राजकारणात सध्या सुजित झावरे पाटील काय भूमिका घेतात राजकीय संदर्भीय अभ्यास केला तर सुजित झावरे पाटील हे सध्या तालुक्याच्या राजकारणात किंगमेकर च्या भूमिकेत दिसून येतात त्यामुळे ते कोणत्या उमेदवारा सोबत भूमिका घेऊन जाहीर करतात हे समजेल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!