Disha Shakti

Uncategorized

स्व पक्षाच्या दबावामुळे माझी माघार-सुरेशराव लांबे पाटील

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : चालू विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष व इतर मित्र पक्ष यांनी परिवर्तन महाशक्ती ची स्थापना केल्याने राहुरी ची जागा प्रहार जनशक्ती पक्षाला मिळेल ही अपेक्षा होती परंतु ती जागा मित्र पक्षाला गेल्याने माझ्यावर अन्याय झाला, माझ्या अपक्ष उमेदवारीमुळे परिवर्तन महाशक्ती मधील मित्र पक्षातील नेत्यांनी माझ्या अपक्ष उमेदवारीला विरोध केला व माझ्यावर प्रेमाचा दबाव टाकून माझी निवडणूक लढण्याची इच्छा असतानाही मला उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले अशी माहिती प्रहारचे राहुरी तालुका अध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना लांबे पाटील म्हणाले गेली अनेक वर्ष प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शेतकरी व सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नावर विविध प्रकारे मोर्चा आंदोलन करून शेतकरी व सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला नी प्रहार जनशक्ती पक्षाचे नाव तालुक्यातील प्रत्येक घराघरात पोहोच केले,अनेकांशी वैर पत्करले स्वताचे नुस्कान केले, त्याची तमा न बाळगता आज पर्यंत लढा दिला,तरीही पक्षाने माझ्या उमेदवारीचा कुठलाही विचार केला नाही व मित्र पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी देतानाही मला विश्वासात घेतले नाही त्यामुळे मी पक्षाचा व पक्षाच्या नेत्यांचा आदर करत उमेदवारी अर्ज माघार घेतला परंतु पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्याचा शब्द दिला नाही,माझा कुठल्याही पक्षाच्या नेत्याशी वैयक्तिक वाद नसून जो काही वाद आहे तो तत्वाचा वाद आहे.तो वाद जनहीतासाठीच आहे,माझा पाठिंबा जाहीर अटीवर असनारे आहे.

या निवडणुकीतील जो उमेदवार राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी बंद पडलेल्या संस्था चालू करेल. तसेच कष्टकरी साखर कारखान्यातील कामगारांचे थकीत पगार ग्रॅज्युटी फंड देणे,तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आरोग्यासाठी सुसज्ज ग्रामीण रुग्णालय.सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नवीन उद्योग एमआयडीसी. मुळा धरण व राहुरी कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना नोकरी हक्काची नोकरी.प्रत्येक गावात व वस्तीवर जाण्यासाठी रस्ते व ईतर या सर्व प्रश्नावर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल व प्रलंबित प्रश्न सोडवण्या-या उमेदवाराला या वरील अटीवर सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन दोन दिवसात उघड पाठिंबा दिला जाईल मग तो उमेदवार कोनीही असो, आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा देऊ त्या उमेदवाराचा विजय निश्चित होईल असा विश्वास शेतकरी नेते सुरेशराव लांबे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!