राहुरी ग्रामीण प्रतिनिधी / आर.आर.जाधव : गावागावात गेल्यानंतर तरुणाचे महिला भगिनी मतदारांचे माझ्यावरील प्रेम पहाता यंदा माझा विजय निश्चित आहे. कारण यापूर्वीच्या सहा निवडणुकांमध्ये जेवढे प्रेम माझ्यावर जनतेने केले नाही तेवढे प्रेम सद्या गावागावात जनता माझ्यावर करत आहे. त्यामुळे आपल्याला जनता निवडून देणारच असा विश्वास शिवाजीराव कर्डिले यांनी ताहराबाद येथील सभेत बोलताना व्यक्त केला आहे. राहुरी तालुक्यातील जांभळी, वावरथ, जांभूळबन, शेरी चिखलठान, वरशिंदे, ताहराबाद बेलकरवाडी, वावळेवाडी, मौसगाव, ताहाराबाद आदी मार्गामधील प्रचार दौऱ्यानिमित्त मतदारांशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टीचे, महायुतीचे राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले बोलत होते. पुढे बोलताना कर्डीले म्हणाले की, मी मागील अनेक वर्षांपासून निवडणूका लढत असून मागील सहा निवडणुकांमध्ये जेव्हडे प्रेम मला मिळाले त्यापेक्षा जास्त प्रेम मला निवडणुकीत पहायला मला मिळत आहे.हे पाहता माझा विजय निश्चित असल्याचे कर्डिले यावेळी बोलताना म्हणाले.
याप्रसंगी व्यासपीठावर देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, धनराज गाडे, आण्णासाहेब बाचकर, राजेंद्र गोपाळे, अविनाश बाचकर सह आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी स्वराज युवा मित्र मंडळ प्रतिष्ठान ताहराबाद, कोतवाल बाबा तरुण मित्र मंडळ, छत्रपती धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान संस्थापक राजुमाऊ शेटे मित्र मंडळ, बोनाई माता मित्र मंडळ पाटीलवाडी आदींसह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply