Disha Shakti

राजकीय

नगरसेवक पै. युवराज पठारे उद्या भूमिका स्पष्ट करणार !

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर नगर विधानसभा मतदारसंघांच्या राजकारणात चढउतार पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीची रेषा मोठी करण्यासाठी खासदार निलेश लंके कटिबद्ध आहेत. महायुतीकडूनही सुद्धा जोरदार प्रयत्न सुरू आहेत. माजी खासदार सुजय विखे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे शिवसेनेचे असलेले नगरसेवक पै. युवराज पठारे रविवार दि. १० नोव्हेंबर रोजी पारनेर येथे पत्रकार परिषद घेऊन राजकीय परिस्थिती बाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे.

पै. पठारे नेमका काय निर्णय घेणार त्याच्या निर्णयाने पारनेर तालुक्याच्या राजकारणात निश्चित फरक पडेल. नगरसेवक पै. युवराज पठारे यांच्या समवेत भाजपचे खजिनदार किरण कोकाटे, शिवसेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र ठुबे, नगरसेवक नवनाथ सोबले, नगरसेवक शालुबाई ठाणगे तसेच पारनेर शहरातील व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उद्या पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणारा असल्याचे सांगण्यात आले आहे. नगरसेवक पै. युवराज पठारे हे अनेक दिवसापासून शिवसेना पक्षामध्ये सक्रियपणे काम करत होते विखे यांचे कट्टर समर्थक म्हणून ते तालुक्यात ओळखले जातात नगरसेवक पै. युवराज पठारे यांच्या सोबत मोठे युवकांचे संघटन आहे. पारनेर शहराच्या विकासासाठी ते नेहमीच कटिबद्ध असतात कुस्ती क्षेत्रामध्येही त्यांचे मोठे काम आहे अनेक कुस्तीपटूंना प्रोत्साहन देऊन नवीन खेळाडू त्यांनी तयार केले आहेत. एक यशस्वी उद्योजक म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये ते प्रवेश करतील अशी शक्यता आहे. परंतु त्या संदर्भात कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही.

नगरसेवक पै. युवराज पठारे यांना संपर्क केला असता प्रवेशा संदर्भात त्यांनी बोलण्यास टाळले परंतु येत्या दि. १० नोव्हेंबरला आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू व पारनेर नगर विधानसभा मतदारसंघातील कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा ते जाहीर करू असे त्यांनी स्पष्टच सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!