राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप व महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथील प्रचार सभेत हजारो उपस्थित जनते समोर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी विरोधकांची खरडपट्टी करत चांगली दाना दान उडवली आहे .जनतेची दिशाभूल करून पोकळ आश्वासने देऊन तसेच फेक नेरेटिव्ह पसरून एखादीच निवडणूक जिंकता येते.
आता जनतेच्या लक्षात आलं आहे की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे किती वाटोळे झाले आणि भाजपशासित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अनेक योजनांमुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे हा फरक लक्षात घेऊन भाजपाच्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांना प्रचंड मतांनी विजयी करून राहुरी तालुक्याचा विकास घडवून आणावा असे आवाहन मंत्री दानवे यांनी उपस्थितांना केले आहे .संविधान बदलाच्या नावाखाली यांनी जनतेची दिशाभूल चालवली आहे .काँग्रेसने आतापर्यंत बहात्तर वेळा संविधानाची पायमल्ली केली असून आता फेक नेरेटिव्ह पसरवण्याचे काम करत आहे .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी जे संविधान दिले त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या काँग्रेस सरकारने भंडाऱ्याच्या व दादरच्या निवडणुकीत पराभूत करण्याचे काम केले आहे .त्यामुळे देशामध्ये नागरिकांची दिशाभूल करून खटाखट वाजवणाऱ्या लोकांच्या नादी न लागता प्रत्यक्ष काम करणाऱ्या भाजप पक्षाच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याची व महाराष्ट्र परिवर्तनाची हीच वेळ असल्याचे मंत्री दानवे यांनी बोलताना सांगितले आहे .
ज्येष्ठ नेते सुभाष पाटील आपल्या अध्यक्षीय भाषणात विरोधकांचे भांडाफोड करून त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला .पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी वांबुरी गटासाठी केलेल्या कामाबद्दल सुभाष पाटील यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले .अनेक वेळा सांगूनही काम न करणारा सांगकाम्या आमदार नसावा .एकाच वेळी सांगितलेली काम झटपट करणारा आमदार कर्डिलेंसारखा माणूस तालुक्याचा आमदार असावा असे मत जेष्ठ नेते सुभाष पाटील यांनी उपस्थितांसमोर मांडले . एक संस्था बंद करून दुसरा खाजगी कारखाना काढण्यात आला सूतगिरणी बंद करून स्वतःची टेक्स्टाईल टाकण्यात आली तालुक्याचे वाटोळे कोणी केले हे जनतेला सर्व माहीत आहे ह्या जनतेने अशा लोकांना निवडून देऊन आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नये असे आवाहन करत शिवाजी कर्डिले यांना बहुमताने निवडून देण्याचे आश्वासन दिले आहे .
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजनांचा शेतकऱ्यांना किती मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहित आहे व पुढील पाच वर्षासाठीही त्यांचे लाईट बिल ही माफ केले आहे तसेच शेतकरी व सर्वसामान्य जनता यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी राबवलेल्या योजनांचे सातत्य राखले जाईल व शेतकरी व सामान्यांच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या जातील म्हणून महायुतीचे सरकार आणण्यासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना बहुमताने निवडून देण्याचे विनंती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित असंख्य जनसमुदायापुढे केली आहे .
याप्रसंगी जनतेच्या मागणीनुसार बोलताना युवा नेते राजूभाऊ शेटे यांनी सांगितले की पाच वर्ष जी चूक केली ती आता परत करू नये असे भावनिक आवाहन उपस्थितांना केले आहे . वांबोरी परिसरात झालेल्या अवैध मुरूम उत्खननाचेही भांडाफोड करून तालुक्याचा कसा विश्वासघात केला हे काही दिवसातच समोरील असे उद्गार आमदार कर्डिले यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी,वांबोरी,सडे,बा भूळगाव, ब्राह्मणी येथील अनेक तरुणांनी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या कार्यक्रमासाठी भाजपतील अनेक पदाधिकाऱ्यांसहित मित्र पक्षातील पदाधिकारी व महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वांबोरी येथे शिवाजी कर्डिलेंच्या प्रचारार्थ माजी केंद्रीय मंत्री दानवे यांनी विरोधकांची उडवली दानादान, खटाखटच्या नादी न लागता झटपट काम करणाऱ्या आमदार कर्डिले यांना विजयी करण्याचे केले आवाहन

0Share
Leave a reply