Disha Shakti

क्रीडा / खेळ

राज्यस्तरीय रोलर स्केटिंग काँम्युटिशन स्पर्धेत गोटुंबे आखाडा येथील यश दगडू तोडमल या खेळाडूने पटकावले ब्रॉंझ पदक

Spread the love

राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : मुंबई मधील विरार येथे दि.९ नोव्हेंबर २०२४ रोजी ११ ते १४ वयोगटातील पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य स्टेट लेव्हल रोलर स्केटिंग काँम्युटिशन स्पर्धेत राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील रहिवासी असलेला व मौर्य अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल राहुरी येथे इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेला यश दगडू तोडमल या विद्यार्थ्याने तिसरा क्रमांक पटकावत ब्राँझ पदक मिळविले आह़े तसेच या सुमार कामगिरीच्या बळावर यश दगडू तोडमल या खेळाडूची मैसुर येथे होणाऱ्या नंँशनल लेव्हल साठी निवड झाली असून त्याची निवड झाल्याबद्दल यश यास RTSA स्केटिंगचे प्रशिक्षक ऋषिकेश तारडे सर आणि त्यांचे सहकारी सुनिल पाले सर यांचें यशचे पालक दगडू तोडमल यांनी त्यांचे आभार मानले आह़े.

तसेच यशच्या कामगिरीबद्दल मौर्य अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील प्राचार्य व शिक्षक वर्ग तसेच राहुरी खुर्दच्या सरपंच मालतीताई साखरे व माजी सरपंच सचिन शेटे, माजी उप सरपंच उमेश बाचकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, बिरु ठोंबरे, पत्रकार रमेश खेमनर यांच्यासह अनेकांकडून यशच्या कामगिरीचे कौतुक होत आह़े.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!