राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी येथील जिल्हा मच्छीमार सहकारी संघाचे चेअरमन शरद सबाजी बाचकर यांचा कार्यकर्ता सवांद मेळावा काल दिनांक.१० नोव्हेंबर रोजी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी येथे पडला. यावेळी यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून कार्यकर्ते उपस्थितीत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक मतकर हे होते तर प्रमुख उपस्थिती गंगाराम कोळेकर, सुनील फूलसौंदर, शशिकांत मतकर, रमेश जगधने, नितीन शहाने, अलका ताई पवार, संजय वाघमोडे, पत्रकार उमेश बाचकर हे होते. या मेळाव्यात मातंग समाजाचे या रमेश जगधने यांनी शरद भाऊ यांनी मातंग समाजाच्या तरुणांसाठी रोजगार निर्माण करून दिला तसेच समाज बांधवांना अडचणी सोडविण्याचे काम केल्याने मातंग समाज शरद भाऊ जो निर्णय घेतील त्यामागे आमचा मातंग समाज कायम पाठीशी राहील असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
शरद बाचकर आपल्या मनोगतात म्हणाले मी आतापर्यंत अठरा वर्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे काम केले आहे या काळामध्ये अनेक समाजातील लोकांना जोडण्याचे काम केले आहे येणाऱ्या काळामध्ये कुठल्या नेत्यासाठी काम न करता या यापुढे महाराष्ट्रातील अनेक विचारवंत तसेच मोठमोठे नेते माझ्या संपर्कात आहे तसेच हा माझा सर्व समाजासाठी आपण मी आपल्या विचारसरणीला जोडले आहे त्यांच्यासाठी महाराष्ट्र मध्ये काम करण्याचे ठरवले आहे.प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी समाज यांना मोठा रोजगार उपलब्ध झाला सर्व समाजासाठी काम केले असे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
यावेळी नानासाहेब कोळपे, भाऊसाहेब कोळेकर, दत्तात्रय चितळकर, विनोद लाटे, संदीप लाटे, दिपक बाचकर, सुदाम बाचकर, रमेश हापसे, भाऊसाहेब शिंदे, प्रशांत वेदपाठक, दिलीप जगधने, बाळासाहेब जगधने, अशोक वाघमारे, रामदास नेटके, गोरख बाचकर राजू दाभाडे, सुनील पंडित, गणेश थोरात, संदीप लाटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.
शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शरद बाचकर यांचा कार्यकर्ता सवांद मेळावा संपन्न, दोन ते तीन दिवसांत सर्वांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करणार – शरद बाचकर

0Share
Leave a reply