श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : वंचित बहुजन आघाडीचे श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अण्णासाहेब आप्पाजी मोहन यांच्या मूळ गावी त्यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज पार पडला. यानंतर हरेगव येथे स्थानिकांच्या मोठ्या उपस्थितीत कॉर्नर सभा झाली यालाही हारेगाव करांनी उपस्थित राहून हरेगवसाह श्रीरामपूर हे वंचित बहुजन आघाडीचे गड होत आहे हे दाखवून दिले.
या दोन्ही कार्यक्रमांना ज्यांनी या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला श्रीरामपूर मतदार संघातून २३,००० मते मिळवून दिली त्या वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे, तालुका अध्यक्ष चरण त्रिभुवन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Leave a reply