राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू असलेल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रचार अंतिम टप्प्यात शिगेला पोहोचला असून तनपुरे व कर्डिले यांच्यात तुल्यबळ लढत सुरू आहे .यामध्ये तनपुरेंवर नाराजी व्यक्त करत तालुक्यातील अनेक गावातून तरुण वर्ग कर्डिलेंना पसंती देत असून त्यांच्या पक्षात जाहीरपणे प्रवेश करत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आमदार तनपुरे यांच्या गोटात मोठी खळबळ उडालेली आहे .
सोमवारी रात्री अचानकपणे डिग्रस येथील असंख्य कार्यकर्त्यांनी बुऱ्हानगर गाठत धर्मवीर छत्रपती संभाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व महायुतीच्या मित्र पक्षाच्या आरपीआयच्या कार्यकर्त्या सीमाताई बोरुडे,हेमंत मकासारे,दत्तात्रय पटेकर,उत्तम अडसुरे व जीवन कांबळे यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेद्वार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना जाहीर पाठिंबा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे .या प्रवेशाबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या पाच वर्षात आम्ही आ . तनपूरेंशी एकनिष्ठ राहूनही आज पावेतो आम्हास न्याय मिळाला नाही त्यामुळे आम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वइच्छेने प्रवेश केलेला असून यापुढे आम्ही कर्डिलेंशी एकनिष्ठ राहून एक दिलाने काम करून कर्डिले यांना विजयी करण्याचा निश्चय केला आहे .
याप्रसंगी डिग्रस ग्रामपंचायत सदस्य अमोल बेल्हेकर, योगेश नालकर,वैभव भागवत ,संतोष राठोड, नितीन पवार, शिवाजी पारधे,सागर दळे, सुभाष दळे,सोमनाथ साळुंखे,विकास दळे, माजिद शेख,सिमूल वाघमारे, विशाल पगारे,विकास जोगदंड,सुनील वामन,आकाश डाडर,रमेश बेल्हेकर, सतीश बोरुडे,तेजस वामन, संजू बर्डे, अनिकेत गीते,अक्षय जाधव, आशुतोष सांगळे,कृष्णा नालकर इत्यादी कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे.
आ.तनपुरेंचा एक छत्री अंमल हटवण्यासाठी डिग्रस येथील असंख्य तरुण कर्डिलेंच्या तंबूत दाखल

0Share
Leave a reply