संगमनेर प्रतिनिधी / धनेश बाळासाहेब कबाडे ; संपूर्ण संगमनेरकरांच्या घराघरातच नाही तर हृदयात वास करणाऱ्या माजी नगराध्यक्षा सौ.दुर्गताई तांबे विधान सभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत . संगमनेर नगर पालिकेत सलग 10 वर्ष नगराध्यक्ष पद भुशिविलेल्या व आपल्या कामातून घरोघरी पोहोचलेल्या व संगमनेर शहराच्या विकासात प्रामुख्याने योगदान असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी व आमदार सत्यजीत सुधीर तांबे यांच्या मातोश्री संगमनेरकरांच्या ताई दुर्गा ताई तांबे ह्या प्रचारासाठी कंबर कसून घरो घरी पोहोचताना दिसत आहे . त्यांच्या कामाचा ठसा त्यांनी जन सामन्याच्या हृदयावर वठविला आहे.
त्यामुळे त्या आल्यावर त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद भेटताना दिसत आहे . आता निवडणूक लागल्यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून दुर्गाताईच हव्यात अश्या देखील प्रतिक्रिया जनसमण्यातून येताना दिसत आहे .
संगमनेच्या लोकप्रिय माजी नगराध्यक्षा करतायेत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या साठी घरोघरी जाऊन प्रचार

0Share
Leave a reply