श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. श्रीरामपूर राहुरी मतदारसंघात लहू कानडे विजयी होतील. त्यांनी गत पाच वर्षांत १२०० कोटींची कामे केली होती. पुढील काळात त्यांना ३ हजार कोटी रुपये देऊ अशी ग्वाही, राज्याचे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी देत श्रीरामपूरला गत वैभव प्राप्त करून देण्याचा वादा पवार यांनी दिला. महायुतीचे उमेदवार आ. लहू कानडे यांची उमेदवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः निश्चित केली होती. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचीही सहमती घेतली, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
आ.लहू कानडे यांच्या प्रचारार्थ शहरातील थत्ते मैदान येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत श्री. पवार बोलत होते. पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक. माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक. देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम., श्रीरामपूर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रानाथ पाटील थोरात. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार. प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक. तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे. भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे. अमृत काका धुमाळ. राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव फारुख पटेल. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिस्टर शेलार. सदस्य शरद नवले. बाजार समितीचे माजी सभापती नानासाहेब पवार. उपसभापती अभिषेक खंडागळे,, माजी नगरसेवक रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, राजेंद्र पवार, प्रकाश ढोकणे, सलीम शेख, मोहम्मद शेख, मुख्तार शहा, मेहबूब कुरेशी, भाऊसाहेब मुळे, जितेंद्र छाजेड, विजय शेळके, रवी पाटील, अल्तमश पटेल, मल्लू शिंदे, माजी नगरसेविका अर्चना पानसरे, स्नेहल खोरे, संगीता शेळके, आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, रिपब्लिकन पक्षाचे सुरेंद्र थोरात, भीमा बागुल, सुभाष त्रिभुवन, उद्योजक अंकुश कानडे, आदींसह मान्यवर उपस्थित होते माजी नगरसेविका जयश्री शेळके विजय शेळके यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.
अजित पवार म्हणाले, आपण शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानतो. किमान कार्यक्रमावर महायुतीतील तीनही पक्ष सोबत आहोत. लाडक्या बहिणींना मदतीचा निर्णय घेतला. त्यावर विरोधकांनी तिजोरी खाली झाल्याची टीका केली. बहिणींना दिलेली दिवाळीची भेट पुढची पाच वर्षे सुरू राहणार आहे. आ. कानडे हे उच्च शिक्षित आहेत. त्यांची पत्नी, मुलगा, मुली हे यशस्वी कारकीर्द गाजवत आहेत. प्रशासकीय सेवेचा त्यांना दांडगा अनुभव आहे. हागणदारी मुक्त गाव योजनेचे ते जनक आहेत. अतिशय बिकट आर्थिक स्थितीतून पुढे आलेला हा संवेदनशील लेखक आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने कानडे यांची उमेदवारी कापली. मात्र या उमद्या कार्यकर्त्याच्या मागे मी भक्कमपणे उभा राहिलो.
श्रीरामपूर मतदारसंघात देवळाली प्रवरा हे माझे आजोळ आहे. श्रीरामपूरला लहानपणी चित्रपट पहायला यायचो. येथील आर्थिक सुबत्ता जवळून अनुभवली आहे. महायुतीच्या सरकारमध्ये लहू कानडे यांच्या माध्यमातून श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देण्याचे वचन पवार यांनी दिले.
लाडकी बहिण योजना सुरू राहणार
लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्षे सुरू राहणार आहे. महायुती सरकारला लाडक्या बहिणींची काळजी आहे. योजनेत भरीव वाढ करणार आहे, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली-
मुख्यमंत्र्यांची सभा मी रद्द केली
महायुतीचे भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी आयोजित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा मी रद्द केली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी स्वतः कानडे यांची उमेदवारी निश्चित केली. कांबळे हे आजारी वगैरे नसून ते ढोंग करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्याच सभेसाठी उभारण्यात आलेल्या मंडपात आज सभा होते, महायुतीकडून मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश आहेत. यावरून सर्व काही स्पष्ट होते. कानडे हेच अधिकृत उमेदवार असून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. असे अजित पवार म्हणाले.
आ. कानडे म्हणाले, पाच वर्षापूर्वी काँग्रेसला उमेदवार नसल्याने त्यांनी उमेदवाराची गळ घातली. मायबाप जनतेने विश्वास दाखवून मला आमदार केले. ती जबाबदारी समजून आपण राजकीय गट गट. पक्ष असा भेदभाव न करता विकास कामांसाठी निधी दिला. तालुक्यात बाराशे कोटी रुपयांची विकास कामे केली. परंतु कपट कारस्थान करून आपली उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी संपर्क करून मुंबईला बोलावले. दुसरा फोन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आला. श्री. पवार यांनी मुख्यमंत्री अमित शहा, श्री. विखे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आपल्याला उमेदवारी दिली. माजी आमदार चंद्रशेखर कदम व नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी मेळावा घेऊन पाठिंबा दिला. रिपब्लिकन पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे मी मानतो, असे ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. भाजपाचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, अमृत काका धुमाळ, देवळालीचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगरसेवक राजेंद्र पवार, फारूक पटेल यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य कार्यकारणी सदस्य सुनील थोरात, शहराध्यक्ष अभिजीत लिप्टे, संदीप चोरगे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष साजिद मिर्झा, सैफ शेख, भाजपाचे विधानसभा समन्वयक नितीन दिनकर, केतन खोरे, गणेश राठी, मारुती बिंगले, गिरीधर आसने, गणेश मुद्गुले, बाबासाहेब चिडे, नानासाहेब शिंदे, राधाकृष्ण आहेर, भाऊसाहेब बांद्रे, अजित चव्हाण, सुधीर टिक्कल, शहाजी कदम, रमेश घुले, पी. एस. निकम, रवी गायकवाड, सचिन ब्राह्मणे, सागर कुऱ्हाडे, संपत चितळकर, चांगदेव देवराय, योगेश जाधव, अशोक गागरे, शामराव निमसे, कोंडीराम विटनोर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष मंदाताई गवारे, सरपंच मंजुश्री ढोकचौळे, पुष्पलता हरदास, रमा धिवर, मनीषा थोरात, सीमा पटारे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, सरपंच अशोक भोसले, सागर मुठे, हरिभाऊ बनसोडे, आबा पवार, सुरेश पवार, राजेंद्र औताडे, रमेश आव्हाड, दीपक कदम, राधाकृष्ण तांबे, अक्षय नाईक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष यांच्यासह महायुतीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेला प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे मंडपाच्या बाहेर लोकांना उभे राहावे लागले. हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पोलिसांना सांगितले की, स्टेजसमोर सुरक्षिततेसाठी सोडलेली मोकळी जागा आहे, तिथे लोकांना बसायला सांगा, माझ्या जीवाला काही होत नाही. माझे काय बरे वाईट व्हायचे ते होऊ देत. त्याला मी जबाबदार राहील. आम्ही लोकात राहणारे असून लोकांसाठी काम करतो. त्यांना बसायला जागा द्या, अशी सूचना त्यांनी केली.
आ.कानडे यांना तीन हजार कोटी रुपयांचा निधी देणार – उपमख्यमंत्री अजित पवार, कानडे यांची उमेदवारी मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस व मी स्वतः निश्चित केली

0Share
Leave a reply