श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : जय बजरंग जय वडार महासंघ संघटना भारत या संघटनेच्यावतीने महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गोरख अण्णा जगन्नाथ धनवटे यांनी श्रीरामपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्ष व महायुतीचे उमेदवार लहू कानडे यांना पाठिंबा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचारधारा अजित पवार यांच्या नेतृत्वावरील श्रद्धा व आमदार कानडे यांचे विकास कार्य या बाबीचा विचार करून संघटनेच्या वतीने पाठिंबा देत आहे आपण केलेल्या पाच वर्षातील श्रीरामपूर मधील विकास कामे पाहता संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी ग्वाही श्री धनवटे यांनी यावेळी दिली.
यावेळी आमदार कानडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव फारूक पटेल नगरसेवक मोहम्मद शेख अक्षय नाईक दीपक कदम आकाश क्षीरसागर बाळासाहेब उंडे प्रकाश पाऊलबुद्धे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जय बजरंग जय वडार महासंघ संघटनेच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार लहू कानडे यांना पाठिंबा

0Share
Leave a reply