Disha Shakti

इतर

डॉ. किरण कोकाटे यांना पितृशोक

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव :  नवी दिल्लीच्या भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे माजी उपमहासंचालक (कृषि विस्तार) तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. किरण कोकाटे यांचे वडिल कै. दत्तात्रेय गेनबा कोकाटे, माजी अधिक्षक, कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांचे दि. 10 नोव्हेंबर, 2024 रोजी अल्प आजाराने वयाच्या 97 वर्षी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सेवा सुरू केली व 31 वर्ष सेवा झाल्यावर वयाच्या 51 व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी त्यांच्या निवृत्ती वेतनाच्या पैशातून पाषाण येथील कोरडवाहू जमिनीमध्ये विहिर खोदून सिंचनाची व्यवस्था केली व चांगल्या पध्दतीने शेती केली. शालेय जीवनात दिवसा काम करून रात्रीच्या शाळेमध्ये शिक्षण घेतले.

त्याचप्रकारे शासनाची उत्कृष्ट सेवा देखील केली. त्यांनी त्यांच्या तीन मुलांना व एका मुलीला उच्च शिक्षण दिले. ते व त्यांची पत्नी कै. सौ. कमल यांनी मुलांवर, नातवंडांवर व सर्व नातेवाईकांवर चांगले संस्कार केले. अशा पध्दतीने ते एक आदर्श जीवन जगले. त्यांचा दशक्रिया विधी दि. 19 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी साडे आठ वाजता सोमेश्वर वाडी, पाषाण, पुणे येथे आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!