Disha Shakti

राजकीय

आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेस गोटुंबे आखाडा येथील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, रासप व भाजपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Spread the love

राहुरी प्रतिनीधी / उमेश बाचकर : राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये तरुणांचा वाढता ओघ आ. प्राजक्त तनपुरे यांना पाठींबा देत असल्याचे चित्र तालुक्यातील निर्माण झाले आहे. राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा या गावामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आ.तनपुरे यांच्याहस्ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने गोटुंबे आखाडा येथे आ.प्राजक्त तनपुरे यांना पाठबळ मिळणार असून रासपचे अल्पसंख्याक राहुरी तालुका अध्यक्ष बिलाल भाई शेख, अकिल पठाण, असीफ शेख, शाकीर शेख, मासूम शेख, भाजपचे तरुण कार्यकर्ते संदीप (दादा) बाचकर, कृष्णा वडीतके, नितीन बाचकर, पोपट बनकर, लहानू लोंढे, सचिन बाचकर, यांनी भाजपाला रामराम करत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत यावेळी तुतारी हाती घेतली आहे.

आमदार तनपुरे यांनी बोलताना सांगितले की गोटुंबे आखाडा या गावातील ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला गायरान व गावठाण जमिनीबाबतचा प्रश्न महाविकास आघाडीची सत्ता असताना मी हाती घेतला होता विद्यापीठ व शासनाच्या दरबारी कृषी मंत्री दादा भुसे व अधिकारी आम्ही बैठक घेऊन विद्यापीठाला माहितीही मागविली परंतु कालांतराने कृषी मंत्री भुसे विमानाने गुहाटीला गेले आणी प्रश्न तसाच प्रलंबित राहिला परंतु आता महाविकास आघाडीचे सरकार येणार असून सरकार आल्यानंतर नवीन कृषी मंत्र्यामार्फत हा अर्धवट राहिलेला प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.

यावेळी सुरेशराव लांबे, विजयराव तमनर, उमेश बाचकर, अय्युब पठाण, गेनूभाऊ तोडमल, वत्सलाबाई निमसे, राम तोडमल, जालिंदर गडधे, गंगाराम शेडगे, दिपक शेडगे, जालिंदर शेडगे, विलास कोपनर, नंदू हरिश्चंद्रे, शिवाजी पवार, मुकिंदा शिंदे, दिलीप जाधव, संभाजी पवार, सुनील शिंदे, भारत पवार, मधुकर भवार, प्रभाकर दाभाडे, रमेश जगधने, सुनील पंडित, यांच्यासह शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!