राहुरी प्रतिनिधी / रमेश खेमनर : राहुरी नगर पाथर्डी मतदार संघाचे उमदेवार व विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनसंवाद यात्रेस तमनर आखाडा येथील जनतेकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून आमदार तनपुरे यांचे तमनर आखाडा गावात आगमन होताच नागरिकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. चेअरमन गंगाधर तमनर यांनी तमनर आखाडा येथील मुलींना शिक्षण घेण्यासाठी देसवंडी येथे जाण्यासाठी देवनदीतील रस्त्याचा व गावातील मुख्य रस्त्याबाबत प्रश्न मांडला असता त्याठिकाणी येत्या काही काळातच त्या नदीवर पूल बांधण्याचे काम मार्गी लावले जाईल व तमनर आखाडयावरील प्रमुख रस्ते पूर्वीच झाले असते महायुती सरकारच्या आडमुठी धोरणामुळे ही कामे प्रलंबित राहिली असून गतीमान महाविकास आघाडीचे सरकार येताच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिले.
विजयराव तमनर म्हणालेकी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी धनगर समाज बांधाना प्रत्येक संकटावेळी न्याय देण्याच काम केले तसेच समाज बांधावांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात ते ठामपणे उभे राहिले व समाजाला मदत केली त्यामुळे राहुरी मतदार संघातील धनगर समाज पूर्ण ताकतीनिशी प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी उभा आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानि मच्छिंद्र भागवत तमनर हे होते व तसेच यावेळी रावसाहेब तमनर, हरिभाऊ तमनर, गंगाधर तमनर, विजयराव तमनर, आप्पासाहेब नारायण तमनर, कोंडाजी तमनर, सावित्रा तमनर, ताराचंद तमनर, भानुदास तमनर सर, दिलीप तमनर, विलास कोपनर, कोंडीराम तमनर, सुरेश तमनर, हिरामण तमनर, विलास बापू तमनर, माजी सरपंच हिरामण तमनर, ताराचंद पाटील तमनर, राजाराम पाटील तमनर, ऋषिकेश तमनर, आण्णासाहेब तमनर, नारायण कोपनर, अथर्व कोपनर, व विकास मंडळाचे कार्यकर्ते संतराम दादा तमनर यांच्यासह मोठ्या प्रमाणात तमनर आखाडा येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
तमनर आखाडा येथील नागरिकांनी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे पुष्पवृष्टी करत केले स्वागत, धनगर समाज पूर्ण ताकतीने आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी उभा राहणार : विजयराव तमनर

0Share
Leave a reply