Disha Shakti

राजकीय

वरवंडी येथे अक्षय कर्डीले यांच्या पायी प्रचार फेरीत वरवंडीतील अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / आर.आर. जाधव : नगर -पाथर्डी विधानसभा मतदार संघातील निवडणुक प्रचार अंतिम टप्यात पोहचला असुन प्राजक्तदादा तनपुरे – व शिवाजीराव कर्डीले साहेब यांच्यात तुल्यबळ लढत चालु असुन दोन्हीही उमेदवार आपापली ताकद मतदार संघात तयार करत आहेत . काल दि १६ / ११ / २०२४ रोजी वरवंडी येथे शिवाजीराव कर्डीले यांच्या प्रचारासाठी चिरंजीव अक्षय कर्डीले यांची प्रचारफेरी झाली दरम्यान खडकवाडी मानेवस्ती येथे अनेकांनी अक्षय कर्डीले यांचे उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला . यामध्ये प्रामुख्याने पोपट किसण माने , बाळासाहेब माने , केशव माने , नाथा माने , सोमनाथ माने , श्रावण कोळेकर ,रेवजी सबाजी बरे ,सचिन बरे , लहाणु गर्दै ,अमोल साळवे सावळेराम कोळेकर सहआदीचा समावेश आहे.

वरवंडी मध्ये कर्डील साहेबांच्या माध्यमातून अनेक कामे झालेली असुन या पुढे ही अशीच कामे केली जातील तरी कर्डीले साहेबांना निवडून देण्याचे आवाहन अक्षय कर्डीले यांनी उपस्थितांना केले . या प्रचार फेरीत प्रामुख्याने पडुरंग काळे , मुक्ताजी ऐनर , सुखदेव कदम , आंबादास बरे , शिवाजी कदम , सह मोठ्या संखेने ग्रामस्थ सहभागी होते . यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग दिसुन आला आहे. ग्रामीण भागात तरुण वर्गाने मोठ्या संख्येने आ.कर्डीले यांना पसंती दिल्याचे दिसुन येत आहे.

यावेळची निवडणूक ही परिवर्तनाची लाट घडवण्यासाठीच तालुक्यासह खेडेगावतही तरुणांनी हातात घेतल्याचे चित्र दिसत आहे .


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!