Disha Shakti

राजकीय

काम करणाऱ्या आमदाराचे तिकीट नाकारल्याने मतदार संघात संताप, लहू कानडे यांचा विजय निश्चित – अविनाश आदिक

Spread the love

श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : काँग्रेस पक्षाने काम करणाऱ्या आमदाराचे तिकीट कापल्याने मतदार संघातील नागरिकांमध्ये तीव्र संताप दिसून येत आहे. महायुतीने त्यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या प्रचार सभांना व रॅलींना जो उदंड प्रतिसाद मिळाला त्यावरून आ. कानडे यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक यांनी केले.

विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष व महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार लहू कानडे यांच्या प्रचारार्थ लाडगाव, कान्हेगाव, उंबरगाव, वळदगाव येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आ. कानडे, जि. प. चे माजी सदस्य शरद नवले, आदिवासी संघटनेचे नेते शिवाजी गांगुर्डे, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, ॲड. प्रवीण लिप्टे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. संदीप चोरगे, ॲड. जयंत चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.

श्री. आदिक म्हणाले, विधानसभा निवडणुकीनिमित्त संपूर्ण मतदारसंघाचा प्रचार पूर्ण झाला आणि आ. कानडे हे जनतेशी संवाद करीत असताना काँग्रेस पक्षाने तिकीट कापून विश्वासघात केल्याचा संताप जनतेमध्ये आढळून आल्याचे जाणवले. या उलट महायुतीने त्यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन तसेच तिकीट देऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार केले. आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. याचा आनंद आणि उत्साह गावोगावाच्या प्रचार सभांमधून स्पष्टपणे जाणवला.

आ. कानडे यांची पक्षांतर्गत केली जाणारे कोंडी, कोरोनाचे महामारीने वाया गेलेले दिवस व विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम करण्याची आलेली वेळ, असे असूनही शासन प्रशासनातील ज्ञान व अनुभवाच्या बळावर संकटावर मात करून मतदारसंघातील विकास कामांसाठी भरीव निधी आणला. भेदभाव न करता सर्वांची कामे केली. सर्वांना नेहमी उपलब्ध राहिले, अशा काम करणाऱ्या नेत्यावर अन्याय केला गेल्याने या निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून लाभलेल्या संधीचे मतदारांनी सोने करायचे ठरवले आहे. त्यांच्या प्रचार सभांना व रिलीजना जो उदंड प्रतिसाद मिळाला, त्याचे हे द्योतक आहे. त्यामुळे लहू कानडे यांच्या घड्याळाचा विजय निश्चित असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते अविनाश आदिक यांनी समारोपप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी आ. कानडे म्हणाले, गेल्या निवडणुकीत मायबाप जनतेने आपल्यावर प्रेम करत निवडून दिले. ती जबाबदारी समजून आपण भेदभाव न करता तसेच पारदर्शकपणे विकास कामे केली. मतदारसंघात बाराशे कोटीहून अधिक रुपयांचा विकास निधी आणून रस्ते, वीज, शेती, महिला, युवक यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, मतदारसंघातील रस्ते, तलाठी कार्यालय, सर्व शाळांना एल.एफ.डी, हायमॅक्स दिवे, विज रोहीत्रे, विज उपकेंद्र अशी विकासाची कामे केली. विकास कामांमुळे आपल्याला उमेदवारी मिळेल असे वाटत असताना विरोधकांनी कटकारस्थान करून तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे कान भरून आपली उमेदवारी कापली.

ज्यांनी कट कारस्थान करून आपल्याला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु जो खरा असतो त्याच्या पाठीशी देव असतो, याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे हे देवासारखे धावून आले, तिकीट कापल्यामुळे निर्माण झालेली संतापची लाट त्यांनी आपल्याला उमेदवारी देऊन शमविली, जे एकाकी पडायला निघाले होते ते आता एकटे पडले आहेत, ज्यांनी उमेदवारी मागे घेण्याची अपेक्षा होती ते विरोधकांना मदत करण्याचे उद्देशाने गोंधळ व संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले,

यावेळी सरपंच अशोक भोसले, सरपंच सुरेखा देवराय, अशोक कारखान्याचे संचालक बाळासाहेब मुंगसे, विराज भोसले, शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, रामराव शेटे, भाऊसाहेब क्षीरसागर, माजी सरपंच रेश्मा शेख, ॲड. मधुकर भोसले विष्णुपंत भांड, अण्णासाहेब गोलवड, छगनराव क्षिरसागर, गणेश शेळके, आदिनाथ भांड, सखाराम भालेराव, रावसाहेब भांड, अविनाश गोलवड, गोविंद भांड, रवींद्र मोरे, हरिभाऊ चव्हाण, अजय बर्डे, अशोक शिंदे, उत्तमराव खरात, विलास तुपे, चांगदेव देवराय, संजय खरात, जगदीश खरात, शिवाजी खरात, प्रकाश चौधरी, महेश खरात, सुनील खरात, ऋषिकेश खरात, वसंत खरात, अण्णासाहेब खरात, अजित आढाव, राजाराम भोसले, उपसरपंच राजेंद्र ओहोळ, बाबासाहेब कोळसे, संजय भोसले, चोखा लोखंडे, संदीप लोखंडे, माजी सरपंच अरुण खंडागळे, दत्तात्रय तांबे, आदित्य शेटे, जगन्नाथ भोसले, रवींद्र भोसले, रमेश निकम, हेमंत कोळसे, बाबासाहेब कोळसे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!