Disha Shakti

Uncategorized

तुळजापूरचे उमेदवार राणा दादा पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे यांनी घरोघरी जाऊन साधला महिलांशी संवाद

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राणा दादा पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे यांनी घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधून राणा दादांना विजयी करण्याचे आव्हान केले. गेल्या अडीच वर्षात राणा दादानी न भूतो विकासात्मक कार्याचा धडाका लावला असून आगामी काळात तालुक्याच्या सर्वांनी विकासासाठी राहणार आहे पुनश्च संधी देण्याचे आवाहन केले. अणदूर शहरासाठी जवळपास 14 कोटी हून अधिक निधी दिला असून भावी काळात सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाचा योगदान महत्त्वाचे असल्याचे यावेळी बोलताना कांबळे यांनी सांगितले.

अणदूर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राणा दादांच्या विजयासाठी जिल्हा उपाध्यक्ष दीपक दादा आलूरे, युवा नेते सुनील चव्हाण, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, शहराध्यक्ष दीपक दादा घोडके, दयानंद मुडके, साहेबराव घुगे, लक्ष्मण बोंगर्गे, डॉ.बिराजदार, शैलजा कडमसे, रेणुका लिंबोले, सारिका मोहराळे, सारणे ताई सर कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!