Disha Shakti

सामाजिक

नांदूर ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन उत्सहात साजरा…

Spread the love

राहता प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे : राहता तालुक्यातील नांदूर खु,बु ग्रामपंचायतीच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालून संविधान दिन साजरा करण्यात आला.जगातील सर्वात मोठ्या संसदीय लोकशाहीची सशक्त पायाभरणी करणाऱ्या भारतीय संविधान दिनानिमित्त नांदूर ग्रामपंचायत व नागरिकांच्या वतीने देशवासियांना शुभेच्छा देण्यात आल्या.

संविधान तयार करण्यासाठी २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, १ वर्षानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली. २०१५ मध्ये भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

विविध जाती-धर्मांनी विविध भाषांनी नटलेल्या आपल्या देशाला अखंड आणि एकसंध ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. संविधानाचा प्रचार आणि प्रसार करत देशातील लोकशाही जपण्याचा प्रण घेऊ या !
भारतीय संविधान — आधुनिक भारताची कोनशीला!

प्राचीन काळापासून सांस्कृतिक राष्ट्र असलेल्या भारत देशाला एकात्मता अशा राज्यव्यवस्थेत गुंफून भारताचे एक आधुनिक ‘राष्ट्र-राज्य’ (Nation-State) घडवण्यात यशस्वी ठरलेल्या भारतीय संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष!आपल्या संविधान निर्मात्यांनी भारताचे एक सार्वभौम लोकशाही गणराज्य घडवण्याचा; आणि त्याच्या प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य व समता प्राप्त करून देण्याचा तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता सुनिश्चित करणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा; जो संकल्प केला होता, त्याचे सतत स्मरण करून त्या दिशेने कार्यरत राहण्याची प्रेरणा जागृत ठेवली पाहिजे.

यावेळी उपस्थित नांदूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, विविध संघटनेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!