Disha Shakti

सामाजिक

सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र संस्कार शिक्षण सेवा संस्था यवतचे उ‌द्घाटन

Spread the love

 प्रतिनिधी /प्रवीण वाघमोडे : दि.२६ नोव्हेंबर २०२४ दौंड तालुक्यातील मौजे यवत ता दौंड जिल्हा पुणे माणकोबावाडा साईनगर या ठिकाणी सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र संस्कार शाळा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.

मंगळवार दि. २६ रोजी सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र संस्कार शाळेचे उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता या वेळी यवत ग्रामपंचायतीचे विद्यमान श्री.सरपंच समीर दोरगे,हभप महादेव दोरगे महाराज, सामाजिक कार्यकर्ते गणेश शेळके, श्री.निळकंठेश्वर व्यसनमुक्तीचे सर्वासर्वे व तथा पत्रकार श्री.अक्षय वरकड व त्यांचे पिताश्री श्री.नारायण वरकड, मंगेश मोहन चव्हाण, माऊली फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य. तानाजी संभाजी दिवेकर (संस्थापक अध्यक्ष, श्री रासाई देवी प्राथमिक आश्रम शाळा) नेते) भटके विमुक्त लोक कलावंत बहुउद्देशीय सेवा भावी संस्था, शेळके झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता डाडर,अशोकराव दिवेकर, मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले बालसंगोपन शिक्षण संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी तानाजी गंगाराम चौगुले (सामाजिक कार्यकते) भटके विमुक्त लोककलावंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, संचालीत अभिमान भगवान चव्हाण,अर्जुन धोंडिबा चव्हाण आनंद सुदाम चव्हाण उपस्थित होते.

यवत या ठिकाणी सावित्रीबाई फुले बालसंगोपन केंद्र सुरू झाल्याने भटके विमुक्त जाती जमाती प्रवर्गातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे मोल मजुरी/ रोजंदारी करणाऱ्या कामगारांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे खुली करण्यात आली आहेत यवत येथील इंदिरानगर मार्केट कमिटी झोपडपट्टी येथे राहत असलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बेरोजगारी हातावर पोट भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागते पोटाच्या खळगीपाई मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. आता चिंता मिटली असुन शाळेची गैरसोय दूर झाली आहे. अशी प्रतिक्रिया स्थानिक भटके विमुक्त समाजातील नागरिकांनी व्यक्त केली व यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री सागर चव्हाण असे मनोगत व्यक्त केले कि समाजाने इतरत्र वायपट खर्च न करता या अनाथ निराधार मुलांना मदत करावी उदा.लहान मुलांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस,स्मृतीदिन,पुण्यतिथी,शालेय उपयोगी वस्तू, अन्नदान,कपडे, वह्या, पुस्तके व आर्थिक मदत करावी असे मनोगत यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले बालसंगोपन संस्कार शाळेचे संस्थापक/अध्यक्ष सागर भगवान चव्हाण. उपाध्यक्ष रमेश अर्जुन चव्हाण, सचिव मोहन,  प्रकाश सावंत अधिक्षक मंगेश मोहन चव्हाण, गोरख चिमाजी शेगर, भगवान रामचंद्र चव्हाण,राजु चव्हाण, विजय चव्हाण,अंकुश चव्हाण,अजय सावंत,रोशन शेगर, लखन शेगर,किरण चव्हाण, अक्षय शिंदे,सुनिल शिंदे, भिमराव पिराजी आहेर,माऊली फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य श्री.तानाजी संभाजी दिवेकर (संस्थापक अध्यक्ष, श्री रासाई देवी प्राथमिक आश्रम शाळा) आदी मान्यवर उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!