श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायतअत्तार : सद्गुरू गंगागिरी विद्यालय नाऊर या ठिकाणी बाह्य व्यक्ती मार्गदर्शन निमित्तानेआयोजित कार्यक्रमात निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष संतोष परदेशी बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. आदिनाथ केंकाण सर होते.यावेळी परदेशी यांनी सध्याचे वाढते तापमान, पर्यावरणाचा बिघडलेला समतोल, कमी झालेले आयुर्मान, पशू पक्ष्यांची कमी झालेले प्रमाण वेगवेगळ्या आजारांची संख्या अशा अनेक समस्या खरं तर पर्यावरणाचा समतोल बिघडलेला असल्यामुळे उद्भभवत आहेत त्यामुळे प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून पर्यावरण वाचविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.आई वडील गुरुजण यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यश मिळवण्यासाठी अवांतर वाचनाची आवड निर्माण करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आपल्या वाढदिवसाच्या दिवशी झाड लावा व त्यांचे संगोपन करा.झाड आपल्याला ऑक्सीजन देते. कोरोना काळात ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.त्यामुळे झाडाचे महत्त्व लक्षात घेता निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ राज्यभर वृक्ष लागवडीचे काम करत आहे आपणही आपल्या परीने प्रयत्न करावा.
यावेळी . प्रा. जलाल पटेल सर, श्री. सोन्याबापु शिंदे सर, उद्योजक कृष्णा गुंड, नाऊर गावचे उपसरपंच दिगंबर शिंदे, चंद्रकांत देसाई, महेश नानेकर, अनिकेत गुंड आदी नागरिक आणि शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री तांबे सर, श्री. गांगुर्डे सर, श्री. शिरसाठ सर आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे आयोजन आम्ही नाऊरकर ग्रुप आणि ग्रामपंचायत नाऊर यांनी केले.
Leave a reply