दिशाशक्ती तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील गेल्या तीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व विविध क्षेत्रात ठसा उमटउन ग्रामीण भागात पत्रकारितेचा मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आदर्श पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे यांना राज्यस्तरीय राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.
कॉलेज जीवनापासूनच पत्रकारिता क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन समाज मनात स्वतःचे वलय निर्माण केले. तुळजापूर तालुक्यात शैक्षणिक सामाजिक सहकार क्षेत्रात अनेक प्रश्नावर सडेतोड लेखन करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी असल्याचे प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे. त्यांना यापूर्वी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून जय मल्हार पत्रकार संघाच्या माध्यमातून पंचक्रोशीत विविध उपक्रम राबवून वेगळा आदर्श या संघाने निर्माण केला आहे. नारी शक्तीचा सन्मान, अणदूर भूषण सन्मान, नवरत्नांचा सन्मान, हलगी महोत्सव, कोरोना काळात जनजागृती अभियान व मदत अशी विशेष उपक्रम राबवल्याने संघाचे सर्वत्र कौतुक होताना दिसते.त्यांच्या या कार्याचे विशेष दखल घेऊन मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील माणुसकी मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विवेक राजापुरे यांनी ही निवड घोषित केली असून 5 जानेवारी 25 रोजी विशेष कार्यक्रमात त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
तुळजापूर येथील ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत हगलगुंडे यांना राष्ट्रभक्ती सेवा गौरव पुरस्कार जाहीर

0Share
Leave a reply