Disha Shakti

राजकीय

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व राणा दादा पाटील यांना कॅबिनेट मंत्री मिळण्यासाठी अणदूर ग्रामस्थांचे खंडोबा देवास साकडे

Spread the love

तुळजापूर विशेष प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे धडाकेबाज उमेदवार आमदार राणा दादा पाटील यांच्या विक्रमी विकास कामामुळे व लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळे विक्रमी मताने दुसऱ्यांदा राणा दादा पाटील विजयी झाले असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर राणा दादा कॅबिनेट मंत्री व्हावे यासाठी ग्रामदैवत खंडेराया चरणी महाआरती करून व श्रीफळाचे तोरण बांधून अणदूर येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने साकडे घातल्याचे शहराध्यक्ष दीपक दादा घोडके यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

यावेळी भंडाऱ्याचे मुक्त उधळण करीत येळकोट येळकोट जय मल्हार जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. यावेळी भाजपाचे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष दयानंद मुडके, पंचायत समिती माजी सदस्य साहेबराव घुगे, डॉक्टर विवेक बिराजदार, माजी सरपंच धनराज मुळे, नवनाथ मिटकरी, तात्या काळे, गुंडूच्या गोवें, उमाकांत करपे, विष्णू घुगे, सोमनाथ लंगडे, बाबुराव मुळे, बालाजी कुलकर्णी, देवेंद्र घुगे, स्वप्निल घुगे, अण्णा घुगे, पंडित भोसले सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!