Disha Shakti

Uncategorized

कोणत्याही नोकरीची सुरुवात आणि सेवापूर्ती हसतमुखाने स्वीकारावी- प्राचार्य के एल वाकचौरे ;  राजेंद्र आव्हाड यांनी ३० वर्ष केली ज्ञान मंदिरात विद्यार्थ्यांची सेवा

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार  : नोकरी स्वीकारली की ती तन-मन-धनाने करावी.प्रत्येक कामामध्ये जर मनुष्याने आनंद शोधला की ते काम खूप सोपे होते.असेच काम राजेंद्र आव्हाड यांनी मागील ३० वर्षात केले असून यामुळेच त्यांनी नोकरी स्वीकारताना हसत स्वीकारले व सेवापूर्ती देखील त्यांनी हसतमुखानेच स्वीकारली आहे असे प्रतिपादन प्राचार्य के एल वाकचौरे यांनी आव्हाड यांच्या सेवापुर्ती सोहळा कार्यक्रमाच्या निमित्ताने केले.सोमैया विद्या विहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूलचे कार्यालयीन अधीक्षक श्री राजेंद्र खंडेराव आव्हाड यांनी विद्यालयात ३० वर्ष केलेल्या अविरत सेवेचा गुणगौरव म्हणून त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे,उप प्राचार्या शुभांगी अमृतकर, पर्यवेशिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे,नंथलीन फर्नांडिस, राम थोरे,शाळेचे जनसंपर्क अधिकारी दत्तात्रय सांगळे यांनी आव्हाड यांचा श्रीफळ,शाल व कला शिक्षक मंगेश गायकवाड यांनी रेखाटली फ्रेम देऊन गौरव करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ क्रीडा शिक्षक धनंजय देवकर, ज्येष्ठ शिक्षक बी के तुरकणे,उपप्राचार्या शुभांगी अमृतकर, दत्तात्रय सांगळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली निकम व कविता चांदन यांनी केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!