संगमनेर प्रतिनिधी / धनेश कबाडे : संगमनेर पुरवठा विभाग यांची कार्य प्रणाली बदलण्याची जास्त गरज आहे कारण अनेक वयोवृद्ध, ज्येष्ठ नागरिक अपंग, महिला,यांना त्रास होत आहे. यात नाव कमी, नाव दुरुस्ती, नाव समाविष्ट नवीन शिधापत्रिका बारा अंकी क्रमांक काढणे इत्यादी कामांसाठी आठ आठ नऊ नऊ महिने लागत आहे. यात अनेक सर्वसामान्य नागरिक हेलपाटे मारून वैतागले आहेत.ऑनलाइन प्रणाली हाताळणारा एकच माणूस आहे त्यात साईड फक्त चालली तर चालते अन्यथा साईड बंद पडली तर सर्व काम ठप्प होते.
ऑनलाइन प्रणाली हाताळण्यासाठी कर्मचारी वाढवण्याची नितांत गरज आहे
व त्याचप्रमाणे पुरवठा विभाग येथे लाईट गेल्यानंतर कोणत्याही प्रकारे इन्व्हर्टर अथवा इतर तत्सम उपकरण नसल्याने अनेक वेळ नागरिकांना तटस्थ बसून राहावे लागते यात अनेक नागरिकांच्या रोजी रोटीचे नुकसान होते.यात तहसीलदार साहेब यांनी जातीने लक्ष घालून पुरवठा विभागाची कार्यप्रणाली बदलावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना सर्व चांगल्या सुविधा मिळतील
Leave a reply