दिशाशक्ती प्रतिनिधी / प्रविण वाघमोडे : ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल खडकी तालुका दौंड जिल्हा पुणे येथे शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रविवार दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रोजी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणे हे मुलांना प्रोत्साहन मिळावे त्यांची विचार करण्याचे शक्ती वाढावी त्यांना विज्ञानाचे उपयोगिता व विज्ञानाची गरज विद्यार्थी व समाजाला समजावी यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. प्रदर्शनासाठी प्रोजेक्ट तयार करताना कोणत्या कारणासाठी व कशासाठी करायचा यावर विद्यार्थी हे गांभीर्यपूर्वक विचार करतात यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढते तसेच त्यांच्या कोणत्या अडचणीवर कशी मात करता येईल त्यातून काय नवीन करता येईल याचीही विचार करणारी क्षमता वाढते हा विज्ञान प्रदर्शन चा सर्वात मोठा फायदा म्हणता येईल.
या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी भिगवण पोलीस स्टेशनचे API विनोद महांगडे साहेब, संस्थेचे अध्यक्ष राजू गायकवाड, सचिव ऋषिकेश गायकवाड, खजिनदार तुषार काळे, उपाध्यक्ष तेजस गायकवाड, प्राचार्य बाबू सांगळे ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल खडकी येथील विज्ञान प्रदर्शनात कुरकुंभ येथील CIPALA कंपनीचे काही निवडक प्रोजेक्ट आकर्षणाचे बिंदू बनले आहेत या प्रदर्शनात ब्राईट फ्युचर इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या हुशारीने व त्यांनी आजवर अभ्यास केलेल्या विज्ञान व शिक्षकांच्या साह्याने अनेक समाज उपयोगी असे प्रोजेक्ट बनवले आहेत. टाकाऊ पासून टिकाऊ, शेळीपालनासाठी आवश्यक असणारे शेळ्यांच्या प्रजाती, गांडूळ खत, मधुमक्षिका पालन, शेती उत्पादनातील आधुनिकीकरण, प्रदूषण व इतर प्रोजेक्ट तयार करण्यात आले आहेत प्रदर्शन दोन दिवस चालणार असून शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रोजेक्ट प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन, विज्ञान विषयावर आधारित रांगोळी, जादूचे खेळ व चालता बोलता प्रश्नमंजुषा हे कार्यक्रम घेण्यात आले व रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी खाऊगल्लीचे आयोजन करण्यात आले होते यात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी खाऊगल्लीमध्ये स्टॉल लावले होते या स्टॉलवर शाळेतील सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यानंतर साप दिसल्यानंतर आपण घाबरून जातो या उलट घाबरून न जाता तो साप कुठल्या जातीचा आहे तो विषारी आहे का त्याचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो सर्व विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात भारतातील सर्व संस्कृतीचे दर्शन घडले व यानंतर प्रदर्शनात प्रदर्शित झालेल्या प्रोजेक्ट यांचे मान्यवरांच्या हस्ते मूल्यांकन करून एक ते तीन असे नंबर काढण्यात आले व यांना प्रमाणपत्र ट्रॉफी रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देण्यात आले.
यासाठी रामदास सिताराम गायकवाड (संचालक यशवंतराव सहकारी साखर कारखाना थेऊर) मल्हारी ज्ञानोबा गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते कोलवडी) विश्वास सोपानराव गायकवाड (सामाजिक कार्यकर्ते कोलवडी) प्रकाश तुकाराम गायकवाड (कृषी अधिकारी थेऊर) सयाजी अहिरे सर (माजी प्राचार्य चिंतामणी विद्यालय विद्या मंदिर थेऊर) सुरेश महानवर सर (माजी प्राचार्य चिंतामणी विद्या मंदिर थेऊर) बबन बाबुराव गायकवाड (API पुणे पोलीस) सचिन बाबर सर (पंचायत समिती कार्यक्रम अधिकारी इंदापूर) योगेश बाबर सर (कुरकुंभ MIDC Chemistry) सचिन काळे (STO पुणे) प्रशांत गिरमकर (ॲड. दौंड) बाप्पू भागवत (ॲड. मळद) राहुल अवचट (बारामती ॲग्रो फील्ड ऑफिसर) रामदास कुदळे (माजी उपसरपंच खडकी) अनिल गुणवरे (सरपंच खडकी) मान्यवरांच्या उपस्थितीत होते. यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले व यानंतर प्रशांत गिरमकर, बापू भागवत, सयाजी अहिरे, सुरेश महानवर व संस्थेचे अध्यक्ष राजू गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व यानंतर शाळेचे मुख्याध्यापक बाबू सांगळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले व विज्ञान प्रदर्शन संपले असे जाहीर केले.
Leave a reply