लातूर प्रतिनिधी / नंदराज पोले : दिव्यांग बऱ्याच वेळा समाजात वावरताना लोक अपराधी असल्यासारखं आमच्याकडे पाहतात कधी कधी तर पुण्य मिळावा म्हणून आमच्या खिशात दोन चार रुपये टाकतात आणि आणि सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतात. कधी बस मध्ये चढताना उतरताना मदत करताना लोक खूप संकोचीत आहे दृष्टीने पाहतात. जसं काय अपंग होऊन आम्ही काय गुन्हा केलाय.
कधी कधी सरकारी ऑफिसमध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा आम्हाला बराच शासकीय वर्ग मदत करत नाही. तसं तर आम्हाला दिव्यांग म्हणून कोणाच्या सहानुभूतीची आवश्यकता नाही पण समाजाने ती मोफत मध्ये आम्हाला देऊ नये ही माफक पेक्षा आमची असते. बऱ्याच शासकीय कार्यालयामध्ये चढण्यासाठी व उतरण्यासाठी रॅम्प वॉकची आणि लिफ्टची सुविधा नाही अशावेळी दिव्यांग बांधवांची हेळसांड होते. आणि आम्ही आमच्या गरजा स्वतःचे अंतिम पूर्ण करू शकतो पण हा समाज आमच्यापेक्षाही दृष्टीने आंध आहे. आमच्या हातात जरी कुबड्या असल्या तरी आम्ही स्वाभिमानाने जगू शकतो आणि तितक्याच ताकतीने मेहनतही करून शकतो आम्हाला गरज आहे ती समाजाकडून माणूस म्हणून पाहण्याची आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाची . याही पुढे जाऊन वाटत आज काल सहानुभूती ने काहीच होत नाही खरी आवश्यकता आहे ती आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची .
बऱ्याच लोकांना अपगंत्व आले याचे मूळ कारण कुठे ना कुठे योग्य वयात योग्य आरोग्य सेवा न मिळणे हे ही आहे..
बऱ्याच बालकांना मालिश मसाज आणि फिजिओथेरपिस्ट ही मिळत नाहीत .या लेखातून माझी सरकार आणि आरोग्य विभागाला एवढीच विनंती आहे ..आपल्या सहकार्याने आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात आणि दिव्यांग व्यक्ती ही सामान्य जीवन जगाव . दिव्यांग महणल की ना घरचा सहारा ना लोकांचा ..फक्त मनाच्या आधारे जीवन जगत असतो , त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्याची गरज आहे अस मला वाटतं.
Leave a reply