दिशाशक्ती प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : जागतिक अपंग दिन दरवर्षी 3 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्ती देखील सहजतेने कार्य करू शकतात याबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी म्हणून जागतिक अपंग दिन साजरा केला जातो या दिवशी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात जसे प्रभात फेरी व्याख्याने क्रीडा स्पर्धा भाषण आणि दिव्यांग व्यक्तीचा सन्मान केला जातो संयुक्त राष्ट्र संघा तर्फे.1983 ते.1992 हे दशक अपंगांसाठी अर्पण करण्यात आले होते.
Rpwd..Act..2016. अपंग शब्द ऐवजी दिव्यांग असा.शब्द बदल करण्यात आला आहे म्हणून हा दिवस *जागतिक दिव्यांग दिन म्हणून देखील ओळखला जातो म्हणून आज जगातली दहा टक्के लोकसंख्या म्हणजेच 67 कोटी या ना.त्या. रूपाने अपंग आहेत त्यानुसार केंद्र व राज्य सरकारने निर्णय घेत अपंगांना सोई सवलती देण्याचे काम सुरू झाले महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज योजना सुरू केली रेल्वे बस मध्ये सवलत दिली दिव्यांगांची सात प्रवर्गातून 21 प्रवर्ग करण्यात आल असून अपंगांना नोकरीमध्ये 4 टक्के आरक्षण लागू आल आहे आज देशभरात अपंग व्यक्तींची संख्या .3 कोटी पेक्षा जास्त असून महाराष्ट्र राज्यात 50. लाखाच्या आसपास दिव्यांग बंधू भगिनी ची संख्या आहे .
Leave a reply