Disha Shakti

अपघात

पारनेरमध्ये ब्रेक फेल झाल्यानं ST बस घुसली बस स्थानकात, 2 जण गंभीर जखमी

Spread the love

पारनेर विशेष प्रतिनीधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथील बस स्थानकात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने एसटी थेट बसस्थानकातच घुसल्याची घटना घडली आहे. एसटीने बस स्थानकात बसलेल्या दोन जणांना जबर धडक दिली आहे. धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान ही, बस पारनेरहून मुंबईकडे जाणार होती. अशातच या बसचा ब्रेक झाल्यानं बस डायरेक्ट पारनेर स्थानकातच घुसली आहे.

बस स्थानकात बसलेल्या दोन जणांना जबर धडक दिली आहे. या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, या घटनेमुळं पुन्हा एकदा एसटी बसच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!