दौंड प्रतिनिधी / सुधीर प्रभाकर लोखंडे : दौंड तालुका पंचायत समितीच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या कार्यक्रमांमध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था, बालरंगभूमी परिषद मुंबई आयोजित बालरंगभूमी परिषद पुणे शाखा संयोजित, यहाँ के हम सिकंदर!! कला महोत्सव पुणे या ठिकाणी झाला होता या महोत्सवात दिव्यांग विद्यार्थी यांनी उत्कृष्ट अशा त्यांच्या अभिनय कौशल्यातून कला सादर केल्या त्यावेळी त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिंदे साहेब, समाज कल्याण विभागाचे नानासाहेब मारकड , फडके साहेब, भगत साहेब, शितोळे साहेब, व इतर मान्यवर उपस्थित होते,दिव्यांग तालुकाध्यक्ष सोमनाथ लवांडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष अण्णा दिवेकर, दादासो ढमे, अनिल फरगडे, सुधीर लोखंडे व मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये पंचायत समिती मार्फत दिव्यांगाच्या विविध योजना सांगितल्या. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग घरकुल योजना, श्रावण बाळ योजना ,बीज भांडवल योजना, दिव्यांग बचत गट योजना इत्यादी. कार्यक्रमांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त भाग घेतला.
Leave a reply