दौंड तालुका प्रतिनिधी / सुधीर लोखंडे : 3 डिसेंबरला दरवर्षीप्रमाणे जागतिक दिव्यांग दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कानगाव येथे साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील मुलांना दिव्यांग बांधवांतर्फे शालेय वस्तू, वही व पेन वाटप करण्यात आले. दिव्यांग बांधवांनी आपल्या अपंगात्वावर मात करून समाजामध्ये काम करत राहावे तसेच सर्व समाजाने देखील त्यांना सहकार्य करावे व त्यांच्या दिव्यांगाची कोणीही नकारात्मक चर्चा करू नये, तसेच शासनाने दिव्यांग बांधवांना आर्थिक मदत करावी,अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री मंगेश फडके तंटामुक्ती अध्यक्ष हातवळण , जालिंदर अण्णा दिवेकर, विजय बापू थोरात राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल दौंड तालुका अध्यक्ष, अण्णा चाबुकस्वार, भाऊसाहेब फडके,संतोष आढागळे, डॉ.बापुराव फडके, शाळा समिती अध्यक्ष किरण कोऱ्हाळे, राजेंद्र भदरगे,दादा कुंभार, रामभाऊ महाडिक, संतोष फडके, बाळू शिंदे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शाम जगताप सर, लकडे सर,हराळ सर , राजेंद्र जगताप सर, ठाणेदार सर ,कुंभार मॅडम, कोष्टी मॅडम, खोमणे सर, कानगाव मधील सर्व दिव्यांग बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply