बिलोली प्रतिनिधी / साईनाथ गुडमलवार कासराळीकर : बिलोली तालुक्यातील मौजे कासराळी येथील प्रतिष्ठित व्यापारी, कॅट संघटना तालुकाध्यक्ष तसेच कॉन्टेस्ट ग्रोग्रेन फार्मर प्रोडूसर कंपनीचे डायरेक्टर भागवत मनोहर लोकमनवार यांचा दि.विदर्भ मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड नागपूर अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राचे शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस मा.लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या शुभहस्ते रिबीन कापुन शुभारंभ करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थिती वैभव ठाकरे सर,माजी पोलीस पाटील गंगाराम चरकुलवार, दत्तू पाटील नरंगले, सरपंच प्रतिनिधी संभाजी टोम्पे, उपसरपंच प्रतिनिधी माधव दत्तापल्ले, प्रकाश गंगुलवार, घाळगे सर, शेखर लकडे, जाधव सर, राजू सावकार लोकमनवार,किशन मामा मेहत्रे, उत्तमराव इजुलकंठे,हनमत इजुलकंठे मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन व दीप प्रज्वलन करून प्रत्यक्ष खरेदीला सुरुवात करण्यात आले.
खरेदी केंद्रावर सोयाबीन हमीभाव योजना अंतर्गत प्रतिक्विंटल 4 हजार 892 रुपये दराने खरेदी होणार असून सोयाबीन आणण्यापुर्वी व्यवस्थित वाळवून त्यामधील आर्द्रतेचे प्रमाण 12 टक्याहुन कमी दर्जाचे सोयाबीन असल्याची खात्री करावी त्यासाठी आपल्या सोयाबीनचे नमुने खरेदी केंद्रावर आणून त्यातील आद्रता तपासावी शेतकऱ्यांनी सोयाबीन शेतमाल खरेदी केंद्रावर आणावे.
मागील वर्षी हे केंद्र नांदेड जिल्हात सोयाबीन व चना खरेदी मधे तृतीय क्रमांक मध्ये आले. असून वेळोवेळी शेतकऱ्यांना उत्तम सेवा देण्याचा आमचा मानस असतो, तरी शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त ऑनलाईन करून या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन कॉन्टेस्ट ग्रोग्रेन फार्मर प्रोडूसर कंपनीचे डायरेक्टर भागवत मनोहर लोकमनवार यांनी केले आहे.
यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्रगतिशील शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply