Disha Shakti

इतर

महात्मा फुले कृषि विद्यापिठ व कुलगुरु यांच्या होत असलेल्या बदनामीच्या विरोधात कंत्राटी कर्मचारीही एकवटले, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कुलसचिव यांना निवेदन देत केला निषेध व्यक्त

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव  : महात्मा फुले कृषी विद्यापीठाबाबत काही लोकांकडून विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याबाबत प्रसार माध्यमांद्वारे विनाकारण होत असलेल्या बदनामीच्या विरोधात आज महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचारीही ऐकवटल्याचे दिसून आले. आज दुपारी सव्वा एक वाजता अनेक कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ.अनिल दानवले यांच्याकडे लेखी निवेदन देत निषेध व्यक्त केला. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हंटले आह़े की आम्ही सर्व कंत्राटी मजुर आपल्या महात्मा फुले कृषि विद्यापिठ राहुरी येथिल विविध प्रकल्प, कार्यालये व प्रक्षेत्रावर शेती मशागतीची विविध कामे कंत्राटी पध्दतीने परवानाधारक ठेकेदारांमार्फत आम्ही हजारोच्या संख्येने वर्षानुवर्ष काम करत आहोत. गेल्या काही दिवसांपासुन सोशल मिडीयाच्या माध्यमातुन महात्मा फुले कृषि विद्यापिठ व मा. कुलगुरु महोदय डॉ. पी. जी. पाटील सर यांच्याबद्यल काही विघ्नसंतोषी घटकांकडुन बदनामी केली जात असुन यामुळे आम्हा सर्व कंत्राटी मजुरांच्या भावना दुखावल्या गेल्या असुन यामुळे आम्ही सर्व कंत्राटी कर्मचा-यांकडुन या सर्व ‘गोष्टींचा निषेध व्यक्त करत आहोत.

महात्मा फुले कृषि विद्यापिठाचे देशभर नावलौकीक आहे तसेच या विद्यापिठाला उत्कृष्ट मानांकन प्राप्त आहे. तसेच या विद्यापिठाचे मा. कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील सर यांनी नवनविन योजनांच्या माध्यमाजुन अनेक तरुणांना रोजगार उपलब्ध करुण दिला आहे. तसेच या विद्यापिठातील सर्व अधिकारी व कर्मचारी आम्हा कंत्राटी कर्मचा-यांच्या प्रत्येक दुख व सुखात नहमीच सहभागी होत असतात. अशा विद्यापिठात आम्ही काम करत असल्याचा आम्हा कर्मचा-यांना अभिमान असुन त्यामुळे आम्हा सर्व कर्मचा-यांना नेहमीच काम करताना एक उर्जा मिळते. तसेच विद्यापिठामार्फत अनेक कर्मचा-यांचे कुटुंबांचा उदारनिर्वाह चालत असुन विद्यापिठ हे कंत्राटी कर्मचा-यांचे एक कुटुंब असुन तसेच मा. कुलगुरु महोदय पी. जी. पाटील सर हे या कुटुंबाचे प्रमुख असुन त्यांची केली जाणारी बदनामी ही कदापीही सहन केली जाणार नाही याची आपण योग्य दखल घ्यावी ही विनंती. व जे विघ्नसंतोषी घटक बदनामी करत आहेत त्या सर्व घटकांचा आम्हा सर्व खालील कंत्राटी कर्मचा-यांकडुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे असे या निवेदनात नमूद केले आह़े.यावेळी विद्यापीठात विविध ठिकाणी काम करणारे कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!