Disha Shakti

इतर

व्हाईस ऑफ मीडियाच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी सचिन तोग्गि यांची निवड

Spread the love

तुळजापूर प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : जय मल्हार पत्रकार संघाचे सदस्य तथा सर्व सामान्यांच्या हाकेला धावून जाणारा पत्रकार तथा सावकार म्हणून ओळखला जाणारा सचिन शशिकांत तोगगी यांची व्हाईस ऑफ मीडिया डिजिटल विंग च्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.अवघ्या पाच एक वर्षात पत्रकारिता क्षेत्रात पदार्पण करून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारितेचा गंध नसतानाही केवळ संघाच्या विविध कार्यक्रमात हिरारिने भाग घेऊन स्वतःचे या क्षेत्रात अस्तित्व निर्माण केले.

जगभरातील 47 देशात पत्रकारांचे संघटन करून विविध प्रश्नावर आवाज उठवण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून केले जाते. या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे दिशाशक्ती न्यूज ला बोलताना सांगितले. जय मल्हार पत्रकार संघ हा जिल्ह्यात अग्रेसर असून विविध सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळा आदर्श व पायंडा निर्माण केला असून आगामी काळात हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!