Disha Shakti

सामाजिक

टाकळीढोकेश्वर येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रम ; हभप यशवंत महाराज यांचे जाहीर किर्तन

Spread the love

विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण  : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर येथिल श्री दत्त मंदिर येथे वै. हभप योगीराज महाराज गुळवणी, वै. विठ्ठलबाबा यांच्या कृपाशीर्वादाने व वै. हभप गुरुवर्य बबन महाराज पायमोडे यांच्या प्रेरणेने दरवर्षी प्रमाणे यंदाही शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी दुपारी चार ते सहा वाजता दत्त भजनी मंडळ व टाकळीढोकेश्वर ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्ताने श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्था, ढवळपूरी येथिल हभप यशवंत महाराज थोरात यांचे दत्त जन्माचे सुश्राव्य किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. १४ डिसेंबर रोजी पहाटे ४ वा काकडा भजन, सकाळी ८ वाजता विष्णु सहस्त्रनाम, सकाळी १० वा. गाथा भजन व अन्नदान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दत्त जयंतीचे यावर्षी चे ५४ वे वर्ष आहे. या निमित्ताने मंदिरावर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. सायंकाळी चार ते सहा या वेळेत हभप यशवंत महाराज थोरात यांचे दत्त जन्माचे किर्तन होईल व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी किर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचा परिसरातील भाविक भक्तांनी व ग्रामस्थांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सेवा सोसायटीचे चेअरमन व संचालक, समस्त ग्रामस्थ टाकळी ढोकेश्वर तसेच सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

मंदिर रंगकामासाठी मदतीचे आवाहन

श्री दत्त मंदिर जिर्णोद्धाराच्या कामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
दत्त मंदिर जिर्णोद्धाराच्या बांधकामासाठी आतापर्यंत अंदाजे जवळपास ४५ ते ५० लक्ष रुपये खर्च करून जिर्णोद्धाराचे काम झाले आहे. त्यामुळे टाकळी ढोकेश्वर गावच्या वैभवात भर पडली आहे. हि फार मोठी गोष्ट आहे. समाजातील घटकांनी अशा कामात योगदान देणे गरजेचे आहे. दत्त मंदिराच्या कलरकामासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!