राहुरी प्रतिनिधी / आर.आर.जाधव : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणित राहुरी येथील अध्यात्मिक केंद्राच्या वतीने गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे व गुरुपुत्र चंद्रकांत दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायण व यज्ञ याग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पारायण सेवेत महिला व पुरुष सेवेकरी सहभागी झाले आहेत. श्री गुरुदेव दत्त नामाचा जयघोष करीत पारायणास सुरुवात करण्यात आली. या सप्ताह काळात सोमवारी ग्रामदेवता सन्मान, मंडल मांडणी व अग्नी स्थापना करून स्थापित देवता हवन करण्यात येऊन गुरुचरित्र पारायनास सुरुवात करण्यात आली. बुधवारी गीताई याग, गुरुवारी स्वामी याग, शुक्रवारी चंडीयाग, शनिवारी रुद्र याग, रविवारी बलि पूर्णहुती व दुपारी 12. 39 वाजता श्री दत्त जन्मोत्सव हा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी साडेदहाच्या आरतीनंतर महाप्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे. यावेळी राहुरी तालुक्यातील 54 केंद्रामध्ये 1008 सेवेकरी गुरुचरित्राचे पारायण वाचन चिंतन मनन करीत असल्याची माहिती विभाग प्रमुख आप्पासाहेब हारदे यांनी दिली. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन समस्त सेवेकर्यांनी केले आहे.
राहुरी येथील अध्यात्मिक केंद्राच्यावतीने दत्त जयंती निमित्ताने गुरुचरित्र पारायण व यज्ञ याग सोहळ्याचे आयोजन

0Share
Leave a reply