विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळीढोकेश्वर गावातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांनी गेल्या सहा वर्षांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात एकत्रित येऊन ` आम्ही टाकळीकर ‘ ग्रुपच्या माध्यमातून कृतीशील ग्रामविकासाची चळवळ उभी करण्यात आली होती या माध्यमातून माथा ते पायथा पाणीदार टाकळी हा संकल्प गावातील ग्रामस्थ व तरुणांनी हाती घेऊन जलसंधारणाची विविध कामे हाती घेऊन गावातील छोटे मोठे बंधारे,केटीवेअर जलसंधारणाचे कामे केली त्याचा परिणाम आज दिसत असून पाण्याची पातळी वाढून शाश्वत जलसाठा उपलब्ध झाला आहे.
नगर – कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील टाकळी ढोकेश्वर हे तालुक्यातील मोठी बाजारपेठचे गाव म्हणून ओळखले जाते. गावातील आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब बांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांनी यासाठी पुढाकार घेत पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी मागिल सहा वर्षांपूर्वी लोकसहभाग, विविध संस्था,सरकारी विभाग यांच्या सहकार्याने (मे २०१९-२०) कोरोना महामारीच्या काळात एकत्रित येऊन जलसंधारणाचे कामे केली. यामध्ये निवडुंगेवाडी तलावाचे खोलीकरण मजबुतीकरण व परिसरातील गावच्या मुख्य ओढ्यावर सात केटीवेअर,छोटे मोठे बंधारे तयार केले. याकरिता कृषी विभाग, वनविभाग, सामाजिक वनीकरण यांचेही सहकार्य लाभले. या सर्व कामामुळे परिसरातील व गावातील पाण्याची पातळी वाढून शाश्वत पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. निसर्गाने साथ दिल्याने यावर्षी झालेल्या भरपूर पावसाने हे सर्व बंधारे केटीवेअर तुडुंब भरून ओढा वाहत आहे.
जलसंधारणाच्या कामांमुळे परिसर बहरला
पावसाळ्यानंतर दोन ते तीन महिन्यात विहिरींचे पाणी अटत असे. सहा वर्षांपूर्वी आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून व गावातील ग्रामस्थ एकत्र येत जलशुद्धीकरण प्रकल्प, गावातील बारव सुशोभीकरण, अमरधाम व शौचालय प्रकल्प नुतनीकरण यासह जलसंधारणाचे कामे ग्रामविकासाची चळवळ उभी केली त्याचा परिणाम याही वर्षी होताना दिसत आहे. सहा वर्षांपूर्वी केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे याही वर्षी मात्र विहिरींना चांगल्या प्रमाणात पाणी असल्याने शेतीसाठी पाणी मिळत आहे. पाण्यामुळे इतरही परिसर बहरला आहे. गावात असणाऱ्या प्रत्येक बंधाऱ्यातील गाळ काढण्यासोबत जलयुक्त शिवार आणि गाळ मुक्त धरण या योजनेअंतर्गत विविध कामे होणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी एक नावीन्यपूर्ण लोकोपयोगी प्रकल्प या भूमिकेतून आम्ही टाकळीकर समुहाने दहा वर्षात दहा प्रकल्प गावात उभारले आहेत.
– डॉ. बाळासाहेब बांडे, अध्यक्ष, आम्ही टाकळीकर ग्रामविकास प्रतिष्ठान, टाकळीढोकेश्वर
जलसंधारणाच्या कामांमुळे टाकळी ढोकेश्वर गावच्या पाणी पातळीत वाढ ; आम्ही टाकळीकर ग्रुपच्या ७ कामांमुळे शाश्वत जलसाठा उपलब्ध, पिण्यासाठी आणि शेतीसाठी मुबलक पाणी

0Share
Leave a reply